गांजा विक्री करणाऱ्यास अटक, १ किलो ७० ग्रॅम गांजा, दुचाकी , मोबाईल असा ७६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त 

Spread the love

 पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

 शिरोली औद्योगिक वसाहतीतील जाफरानी काट्याजवळ बेकायदेशीररित्या गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास शिरोली पोलिसांनी पकडून त्याच्याकडून १ किलो ७० ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ७६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत संशयितास पोलिसानी ताब्यात घेतले.पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी कि शिरोली येथील रविकांत सर्जेराव गाडेकर (वय ३३, रा. विलासनगर, हनुमान मंदिराजवळ, माळवाडी, शिरोली पुलाची) हा रविवार सायंकाळी ४:४५ ते ५:४५ च्या सुमारास शिरोली पुलाची गावच्या हद्दीत जाफरानी काट्याजवळ अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित रविकांत गाडेकर याला ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत २१ हजार ४०० रूपये किमतीचा १ किलो ७० ग्रॅम गांजासह ५ हजार किमतीचा व्हिवो मोबाईल , ५० हजार किमतीची बजाज प्लॅटीना मोटारसायकल क्रमांक ( एम एच १० डी वाय ६९२५ ) व एक काळ्या रंगाची सॅक असा एकूण ७६ हजार ४०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश प्रकाश पाटील यांनी फिर्याद दिली असून गाडेकर याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नजीर शेख, सुहास संकपाळ, ऋषिकेश पवार, ऋषिकेश पाटील, सुनील गोरे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजीत खडके यानी केली .

Leave a Comment

error: Content is protected !!