पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोपजवळ परप्रांतीय तरूण अपघात ठार

Spread the love

टोपजवळ परप्रांतीय तरूण अपघात ठार

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) गावच्या हद्दीत मारुती हॉटेलजवळ मोटारसायकल स्लिप होऊन ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झालेल्या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. १९) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला. राजू निसार खान मियाँ (वय ३६, मूळ रा. बगेन, ता. रघुनाथपूर, जि. बक्सर, बिहार; सध्या रा. संभापूर, ता. हातकणंगले) असे मृत कामगाराचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू मियाँ हे गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटारसायकलवरून (क्र. MH 09 BU 4445) शिरोली एमआयडीसीतील कंपनीत कामावर जात होते. टोप हद्दीतील मारुती हॉटेलजवळ आल्यावर त्यांची मोटारसायकल अचानक स्लिप झाली आणि ते रस्त्यावर कोसळले. त्याच वेळी बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या मागील डाव्या चाकाखाली ते सापडले आणि गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (CPR) दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी शिरोली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!