पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली पुलाची येथे घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असून यातील नराधम आरोपींची कोणतीही गय न करता तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज बुधवारी नागाव कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामस्थांनी एकत्र येत गावातून निषेध मोटरसायकल रॅली काढत आपला संताप व्यक्त केला यावेळी गावातील महिलांनी सहभाग घेतला होता.नागाव ता हातकणंगले येथील सकाळपासूनच गावामधील व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने गावातून मोटरसायकल रॅली काढून निषेध करण्यात आला . यावेळी आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणांना देण्यात आल्या गावातील सर्व दुकानदार व व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद करून या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी .काही ठिकाणी उघडी असलेली दुकाने बंद करण्यावरून व्यापारी आणि कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद झाले. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता व्यापाऱ्यांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि दिवसभर आपले व्यवसाय बंद ठेवून निषेधात सहभाग घेतला.रॅलीच्या समारोपप्रसंगी ग्रामपंचायत प्रशासन आणि शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसण्यासाठी त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली . यावेळी नागावमधील सर्वपक्षीय नेते, ग्रामपंचायत सदस्य, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. बंदच्या पार्श्वभूमीवर गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी पंचायत समिती सदस्य अरूण माळी , उपसरपंच सुधीर पाटील , विकास आघाडीचे नेते विजय पाटील , अनिल शिंदे , पोलिस पाटील बाबासो पाटील, अभिनंदन सोळांकुरे , संजय शिंदे , भाजपा महिला पुर्व जिल्हा चिटणीस सौ आश्विनी पाटील , सौ ज्योती माळी , माजी ग्रामपंचायत सदस्य सौ सुनीता पोवार , राहूल पाटील , राजेंद्र पाटील , किशोर शिंगे , भिमराव खाडे यांच्यासह ग्रामस्थ व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते .