आरोपींचे विज पाणी कनेक्शन बंद, आरोपींना फाशी द्या मागणी करत शिरोली गाव बंद 

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

लव्ह जिहाद प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथला समिर सनदे याला अटक करण्यात आली असून त्याचा मित्र शाहरूख देसाई हा फरार आहे . त्याच्या कडे आठ ते दहा हिंदू समाजांतील युवतींचे अश्लील व्हिडीओ, फोटो असल्याची माहिती समोर आली आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि , शिरोली इथला समीर सनदे याचे जिल्ह्यांतील चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या एका नगरीतील एका युवती सोबत प्रेम प्रकरण होते . त्याचा गैरफायदा घेत त्याने व त्याचा त्याच समाजातील संशयित मित्र शाहरूख देसाई यांनी आठ ते दहा युवतींना गळाला लावले असून त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार केले आहेत . या प्रकरणांची माहिती अन्य कोणाला दिल्यांस हे व्हिडिओ व्हायरल करण्यांची धमकी संशयितांनी या आठ ते दहा युवतींना दिली आहे.मात्र त्यांचा जवळचा मित्र असलेल्या एकाला याची कुणकुण लागली असून त्याने या प्रकरणाला वाचा फोडली आहे . ही माहिती मिळतांच संपूर्ण प्रकरणाचा उद्रेक झाला. आज शिरोली इथं हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आज गाव बंदची हाक दिली होती. संपूर्ण हिंदू समाजामध्ये असंतोष निर्माण झाला होता. गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिरोली फाट्यावरील ग्रामपंचायत कमानी जवळ जमले. आमदार अमल महाडिक आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी ग्राम पंचायत चौकात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना जागेवरच अडवले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपीच्या घरावर बुलडोजर फिरवा, त्याला गावातून हद्दपार करा, त्याला फाशी द्या अशी संतप्त मागणी केली. यावेळी आमदार अमल महाडिक यांनी ग्रामपंचायतीने संबंधित आरोपींचे पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असे आव्हान केले. दरम्यान आम. अशोक माने,उभाठा सेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली. सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय झाल्यानंतर कार्यकर्ते निघून गेले. पण दिवसभर शिरोली परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, यांच्यासह जलद कृती दल, दंगल काबू पथक, आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात होती. संशोध आरोपी सनदे आणि देसाई यांच्या घराभोवती पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!