पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली परिसरातून समोर आलेल्या एका खळबळजनक लव्ह जिहाद प्रकरणामुळे संपूर्ण परिसरच नव्हे जिल्हा हादरून गेला आहे. हिंदू धर्मातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केल्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसानी शिरोलीतील एकास अटक केली पण त्याच्या सोबत असणाऱ्या अन्य दोघांना सह आरोपी करा व आरोपी शिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतला असल्याने गुन्हा हि शिरोली पोलिसात नोंद करा , आरोपीना जे स्थानिक लोक मदत करत आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद करा , या प्रकरणाची पोलिसानी कसून चौकशी करावी , याबाबचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार असून उद्या मंगळवारी गाव बंदची हाक हिंदुत्वादी संघटनेकडून देण्यात आली आहे . या प्रकरणाचे धागेदोरे आता जिल्ह्याच्या अन्य भागातही पोहोचले असून, याची व्याप्ती वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.केवळ शिरोलीच नव्हे, तर हुपरी आणि हातकणंगले तालुक्यातील अनेक निष्पाप तरुणींना या षडयंत्रात लक्ष्य करण्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिरोली येथील एका तरुणाने घडवून आणलेल्या या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सुरुवातीला हे प्रकरण वैयक्तिक स्तरावर मर्यादित असल्याचे वाटत होते, मात्र तपासादरम्यान आणि स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, हे एक मोठे जाळे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संशयित तरुणाने जाणीवपूर्वक हिंदू धर्मातील तरुणींना लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार अनेक निष्पाप तरुणींना विविध आमिषे दाखवून किंवा भावनिक जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न झाला आहे. सोशल मीडियाचा वापर करून या तरुणींशी संपर्क साधला गेल्याची माहिती समोर येत आहे. या कृत्यामागे एखादी संघटित टोळी कार्यरत आहे का? याचा संशय आता बळावला आहे.या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच शिरोलीसह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे शिरोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यानी शिरोली गाव परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे .हिंदुत्ववादी संघटनांनी व स्थानिक नागरिकांनी माळवाडी येथील महादेव मंदिरात एकत्र येवून घटनेचा निषेध करत दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने योग्य पावले उचलावीत, अशी जनभावना निर्माण झाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक केली असून त्याच्या सोबत असणाऱ्या अन्य साथीदारांची चौकशी करून त्याना ही सह आरोपी करावे व त्यांचे कनेक्शन नेमके कुठपर्यंत आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात येणार असून उद्या गावबंदची हा देण्यात आली आहे