पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
जिम चालक भावाच्या पत्नी सोबत शक्ती भोसले याचे अनैतिक संबंध असल्याचे संशयावरून जीम चालकाचा भाऊ आकाश अमोल कोरगावकर याने शक्ती भोसले यास कोरगावकर पेट्रोल पंप पुलाची शिरोली येथे बोलावून कपडे काढून लोखंडी रॉड ने स्टीलच्या पाणी बॉटल ने मारहाण केल्याची फिर्याद गुरुवारी १६ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३.०० वाजता दिली आहे.राज अमोल कोरगावकर याचे कनाननगर येथे रगेडीयन नावाची जिम आहे. या जिम मध्ये राज कोरगावकर याचा मित्र शक्ती भोसले व्यायाम करण्याकरिता येत होता.यातून राज याच्या पत्नीसोबत शक्ती ची ओळख निर्माण झाली . या ओळखीतून या दोघांमध्ये आठ महिन्यापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते.त्याचा राग मनात धरून राज याचा भाऊ आकाश कोरगावकर ( राहणार न्यू पॅलेस कोल्हापूर )याने शक्ती भोसले (वय ३२ रा.शाहूपुरी ४ थी गल्ली )यास गुरुवारी दुपारी ३.०० वाजता सांगली फाटा पुलाची शिरोली येथील कोरगावकर पेट्रोल पंप येथे खोलीत नेवून तुझे माझ्या भावाच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध आहेत. तुझ्यामुळे माझ्या भावाचे आयुष्य खराब झाले आहे .असे म्हणून शक्ती भोसले यांच्या अंगावरील कपडे काढून लोखंडी रॉड ,लाथा बुक्क्यांनी व तोंडावर स्टील पाण्याच्या बाटलीने मारहाण केली .व भोसले याचे पत्नीसही धमकी दिल्याची फिर्याद दोन दिवसांनी दाखल झाली आहे.पुढील तपास स.पो.नि . सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पाखरे तपास करीत आहेत