शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये सध्या अजिंक्य पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी होत आहे.तरुण वर्गासह ज्येष्ठ नागरिकही याबाबत पुढाकार घेत असून,त्यांचे नेतृत्व सक्षम,अभ्यासू व सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी समरस असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.अजिंक्य पाटील हे केवळ एक राजकीय कार्यकर्ते नसून, सामाजिक,शैक्षणिक, क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी राहत असून,गेल्या काही वर्षांत त्यांनी परिसरात भक्कम जनसंपर्क उभा केला आहे. विशेषतः युवकांमध्ये त्यांची एक विश्वासार्ह ओळख निर्माण झाली असून,त्यांनी अनेक तरुणांना दिशा देत,योजनांच्या माध्यमातून स्वावलंबी बनवले आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन मंजुरी,स्थानिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे,नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत नेऊन ते मार्गी लावणे,अशी अनेक कामे त्यांनी सातत्याने केली आहेत.त्यामुळे प्रभागातील सर्व स्तरांतील लोकांमध्ये त्यांच्या कामगिरीबाबत समाधान व विश्वास आहे.”शिरोळ नगरपरिषदेवर खऱ्या अर्थाने सर्व सामान्यांचे नेतृत्व यावे, त्यासाठी अजिंक्य पाटील यांच्यासारख्या तरुण,अभ्यासू आणि लोकांमध्ये मिसळणाऱ्या व्यक्तीस उमेदवारी द्यावी,”अशी मागणी सध्या जोर धरत असून,अनेक स्थानिक संघटना,तरुण मंडळे व ज्येष्ठ नागरिक संघटनेने त्यासाठी एकत्र येऊन पाठिंबा दिला आहे.आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून अजिंक्य पाटील यांच्या उमेदवारीने विकासाभिमुख व लोकाभिमुख नेतृत्व मिळेल,असा विश्वास नागरिकांमध्ये आहे.त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी ही भावना लक्षात घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी,अशी मागणी सातत्याने होत आहे.