टोप येथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना अपहरणाची भिती कि खरेच अपहरण

Spread the love

टोप येथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना अपहरणाची भिती कि खरेच अपहरण , पोलिसात गुन्हा नोंद करण्यासाठी गेलेल्यानाच पोलिसांनी सुनावले ………
संशयीत आरोपी व तक्रारदार यांच्यात पोलिसांसमोरच शिविगाळ करत एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

प्रस्तावित कार्यासन रत्नागिरी नागपूर महामार्गावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना अपहरणाची भिती कि खरेच अपहरण यावर टोप परिसरात दोन दिवसापासून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे , हा प्रकार करणारे हेही टोप परिसरातीलच असल्याने या प्रकरणी गांभीर्य वाढले आहे , पण पोलिसात गुन्हा नोंद करण्यासाठी गेलेल्यानाच पोलिसांनी सुनावले , गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली , संशयीत आरोपी व तक्रारदार यांच्यात पोलिसांसमोरच शिविगाळ करत एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार पोलिस ठाण्यात घडला आहे . अखेर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता..
टोप ता. हातकणंगले येथील दक्षिणवाडीत परिसरात जवळपास २५ कुटुंबीयांची लोकवस्ती असून येथील ९ ते १० वर्षीय मुले शाळेस सुट्टी पडल्याने नागपूर रत्नागिरी महामार्ग या नविन रस्त्यावर क्रिकेट खेळत असताना पूर्वेकडून एक पांढर्‍या रंगाची मोठी कार गाडी त्यांच्या समोर येवून त्यांना धरा गाडीत घाला असा आवाज ऐकताच काही मुलांनी खेळ आर्ध्यावर सोडून पळ काढला पण एकजण त्यांच्या हाती लागला त्याने आरडाओरड केल्यावर त्याला थोड्या अंतरावर सोडून कारने शिये फाट्याकडे पलायन केले . हा सर्व घडला प्रकार मुलांनी आपल्या घरी जावून आई वडीलांना सांगितले त्यानंतर पालकांनी याचा शोध घेण्यासाठी शिरोली पोलिसात या घटनेची माहिती सांगून पुढील तपास करण्यासाठी मदत मागितली पण पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता घटना घडलेच्या २४ तासानंतर त्या गाडीचा शोध करण्यास सूरूवात केली संशयीत आरोपी व गाडी सिसिटिव्ही काॅमेरात कैद झाल्याचे दिसले पण हे सर्व चित्र समोर असताना मुलाच्या वडीलाने पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तक्रार घेण्या ऐवजी त्यानाच सुनावून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे .

संशयीत आरोपीचे बाजूने गावातील राजकीय पुढारी , नेते मंडळी पुढे येवून हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करत होते . मुलाचे वडील व त्यांचे नातेवाईक रितसर तक्रार दाखल करण्यासाठी शिरोली पोलिसात गेले असता संशयित लोकांनी तक्रारदारासच धमकावले व मारण्यासाठी अंगावर धावून गेले.

हा सर्व प्रकार पोलिस ठाण्यात घडला पण अद्यापही पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही तर एवढा गंभीर प्रकार घडला असताना पोलिसांकडून होणार्या हलगर्जीपणाचे ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त होत आहे..

चौकट
अपहरण प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी आलेल्या फिर्यादीस शिविगाळ करत अंगावर धावून जाण्याचा प्रकार पोलिस अधिकाऱ्यांसमोरच आज शुक्रवारी घडला. काही दिवसांपूर्वी नागाव येथील एका प्रकरणामध्ये काही कार्यकर्ते रस्त्यावर उभारले असता काही कारण नसताना त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला होता मात्र अधिकाऱ्यांसमोरच एक कथीत उद्योजक शिविगाळ व जिवेमारण्याची धमकी देतो त्यावर कोणतीच कारवाई होत नाही याचे नागरिकांतून आश्चर्य होत आहे .

error: Content is protected !!