शिरोळ / प्रतिनिधी
येथील असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स & अर्किटेक्ट्स. च्या वतीने इंजि. संतोष सूर्यवंशी यांचा, “प्लांनिंग ऑफ फ्लाय ओवर या विषयावर मार्गदर्शन पर चर्चासत्र संपन्न झाले.मोक्ष गुंडम विश्वेस्वरर्य्या यांच्या प्रतीमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. नितीन शेट्टी यांनी स्वागत केले
असोसिएशनच्या वतीने इंजि संतोष सुर्यवंशी यांचा सत्कार इंजि. नितीन शेट्टी यांनी केला, इंजि. सुजित पाटील यांनी हायटेक केमिकलचे मालक रावसाहेब पाटील यांचा सत्कार केला, तर हायटेक केमिअलचे प्रतिनिधी धनाजी संकपाळ यांचा सत्कार इंजि.धनंजय मुळीक यांनी केला.आर्कि. हेमंत पंडित यांनी इंजि. संतोष सूर्यवंशी, यांचा परीचय करून दिला. या कार्यक्रमाचे निमित्ताने इंजि. संतोष सूर्यवंशी यांनी ‘फ्लाय ओवर प्लांनिंग’ या विषयाबद्दल सविस्तर माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून दिली.सध्या सर्व मोठ्या शहरामध्ये ट्राफिक जामची खूप मोठी समस्या निर्माण होत आहे. या ट्राफिक जाममधून शहराची मुक्तता करणेसाठी फ्लाय ओवरचा मोठा वाटा असतो. त्यासाठी त्या रोडवरील ट्राफिक किती आहे यासाठी त्या रोडवरील ट्राफिकचा सर्वे केला जातो. त्याचबरोबर जागेवर जाऊन जागेची मोजणी करून कोणत्या प्रकारचा फ्लाय ओवर किंवा अंडर पास करायचा हे ठरवले जाते.याप्रसंगी असोसिएशनचे संचालक इंजि. रणजीत माने, इंजि. विनोद मुळीक, इंजि. प्रथमेश पाटील इंजि. लक्ष्मण भोसले आर्कि, हेमंत पंडित व असोसिएशनचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते त्याचबरोबर हायटेक कंपनीचे मालक रावसाहेब पाटील, वसंत पाटील व सुशांत पाटील उपस्थित होते.आभार प्रदर्शन इंजि. नितीन शेट्टी यांनी केले, इंजि. रणजीत माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.