गांजा सेवन करणारे व विक्री करणाऱ्यांची शिरोली व नागाव परिसरातून शिरोली पोलीसानी काढली धिंड  

Spread the love
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
 गां

जा सेवन करणारे व विक्री करणाऱ्यांची शिरोली व नागाव परिसरातून शिरोली पोलीसानी काढली धिंड यामुळे गांजा विक्री करणाऱ्यांची धाबे दणाणले आहेत.

शिरोली पोलीस ठाण्या हददीतील शिरोली पुलाची, माळवाडी तसेच नागाव परीसरात गांजा विक्री व सेवन करणाऱ्या लोकांचेवर पोलिसांनी लक्ष ठेवून कारवाईच्या उद्देशाने वेगवेगळी पथके तयार करून गस्त घालत असताना  जियाऊददीन ताजुददीन मुल्ला रा. सनदे गल्ली शिरोली पुलाची,प्रेमकुमार जोखनलाल रा. संभाजी नगर नागाव, कुलदीप उजागिर राम रा. माळभाग नागाव ता. हातकगणले हे गांजा सेवन करीत असताना मिळुन आलेने त्याना शिरोली पोलिस ठाण्याच्या गस्त पथकाने पकडून त्यांच्यावर कारवाई करुन त्यांची शिरोली पुलाची,माळवाडी व नागाव परीसरात धिंड काढली. शिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणीही अवैद्य रित्या अंमली पदार्थाचा साठा अथवा विक्री करीत असल्यास त्याची माहीती पोलीसांना द्यावी असे अवाहन  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी केले आहे.हा गांजा ते कोठुन आणतात यांचा अधिक तपास सुरु आहे.ही कारवाई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उप निरीक्षक प्रमोद चव्हाण,पोलीस उप निरीक्षक अमित पांडे,पोलीस हेड काॅन्स्टेबल ऋषिकेश पवार,नजीर शेख,सुहास संकपाळ, पाटील यांनी केली आहे.
error: Content is protected !!