अशोकराव माने आमदार झाल्याबद्दल अमोल गावडे यांचे ३ किलोमीटर हिवरखान मंदिरात दंडवत

Spread the love

कुंभोज / प्रतिनिधी

भक्ताच्या हाकेला धावणाऱ्या कुंभोज येथील हिवरखान बिरदेवाला हातकणंगले मतदारसंघातून आमदार दलित मित्र अशोकराव माने बापू यांच्यासाठी युवा नेते अमोल गावडे यांनी वारणा नदीपासून कुंभोज हिवरखान मंदिरा प्रयत्न दंडवत घालीन असं साकडं घातलं होतं.आज बुधवार दिनांक 29 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजता विशाळी अमावस्येच्या निमित्त अमोल गावडे यांनी नदीपासून बिरदेव मंदिरापर्यंत दंडवत घालत अशोकराव बापूंना आमदार केलं म्हणून साकडे पूर्ण केले.अमोल गवळी यांनी नदीपासून बिरदेव मंदिर आपण जवळजवळ तीन किलोमीटर पहाटेपासून दंडवत घातला इतक्या थंडीच्या वातावरणात नदीत अंघोळ करून घातलेल्या दंडवताची व आमदार अशोक माने यांच्यावरील प्रेम व एकनिष्ठ कार्यकर्त्याची चर्चा हातकणंगले विधानसभा मतदार संघात सुरू आहे.

error: Content is protected !!