शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा 2025 मध्ये श्री. पदमाराजे विद्यालयाने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. एलिमेंटरी परीक्षेत 100% निकाल लागला असून, त्यात शर्वरी महेश कुंभार व स्वराज्ञी विजयसिंह पाटील यांनी ‘A’ श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव उज्जवल केले.14 विद्यार्थ्यांनी ‘B’ श्रेणीत व 80 विद्यार्थ्यांनी ‘C’ श्रेणीत उत्तीर्ण होऊन उत्कृष्ट कामगिरी केली.इंटरमिजिएट परीक्षेतही शाळेचे यश सुरूच राहिले आहे. गौरी अमर भातमारे,दुर्वाश्री खंडेराव जगदाळे,प्राची राहूल मांगूरकर, पृथ्वी संजय कोळी, रोहित पांडूरंग पोळ,सादिया नूरमहमद मुल्ला,सन्मती संजय मगदूम,शर्वरी जयंत भोसले,श्रुतिका प्रविण आंबी या विद्यार्थ्यांनी ‘A’ श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासोबतच 11 विद्यार्थ्यांनी ‘B’ श्रेणीत आणि 73 विद्यार्थ्यांनी ‘C’ श्रेणीत यश संपादन केले.शालेच्या या यशात प्राचार्य ए.ए. मुल्ला, उपमुख्याध्यापक टी आर गंगधर आणि कलाशिक्षक अविनाश माने व विनोदकुमार मगदूम यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.शालेच्या यशाबद्दल सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांचे पालकांनी अभिनंदन केले.