Spread the love
जयसिंगपूर / प्रतिनिधी 
रेल्वे रुळावरच एसटी बंद पडल्याने प्रवाशांच्यासह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ उडाली.ही घटना शुक्रवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या रेल्वे फटकाजवळ ही घटना घडली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कुरुंदवाड आगाराची एसटी बस जयसिंगपूर येथून कोथळीकडे जात होती.रेल्वे स्थानकावर रेल्वेचे क्रॉसिंग असल्याकारणाने दोन्हीकडे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.रेल्वे गेल्यानंतर दुचाकी वाहने जा ए करू लागली. त्यात अगदी पुढच्या बाजूला असलेली कुरुंदवाड आगाराची एसटी अचानक रुळावर येऊन बंद पडली.यामुळे रोडवर थांबलेल्या सर्व वाहनधारकांची तसेच एसटीतील प्रवाशांची अक्षरशः भांबेरी उडाली.अखेर प्रवासी आणि या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहन धारकांनी एसटीला धक्का मारून पुढे ढकलून रुळावरून बाहेर काढले.यानंतर एसटी बस मार्गस्थ झाली. दरम्यान यावेळी रेल्वे आली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.या प्रकाराने प्रवाशांनी तसेच या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्यांनी सुटकेचा निस्वास टाकला.कुरुंदवाड आगाराच्या एसटी बाबत कायमची तक्रार असल्याची चर्चा या परिसरात आज होती.
error: Content is protected !!