राष्ट्रसेवा प्रशाला पुलाची शिरोली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

Spread the love

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील राष्ट्रसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राष्ट्रसेवा प्रशाला पुलाची शिरोली या शाळेने दहावी परीक्षेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत शाळेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा राखली या प्रशालेचा १००% टक्के निकाल लागला असून साई संदीप यादव याने ९१.८०% टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक , तनुष्का महेश पाटील हिने ९१.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर जोया जावेद देसाई हिने ९०.६०% टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच समरजीत दत्तात्रेय जाधव याने ८७.६० % टक्के तर वेदिक संजय सुतार हिने ८६.८०% टक्के सिद्धी शशिकांत कुंभार आकांक्षा गणेश देशमुख ८५.२०% टक्के अश्रफ अली मुजफ्फर काझी ८४.८०% टक्के दिया माजी देसाई ८४.२०% टक्के तसेच प्रशालेतील एकूण ११४ विद्यार्थी विद्यार्थी होते त्यापैकी ११४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विशेष यश संपादन केले.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सातत्याने घेतलेले परिश्रम, नियमित सराव परीक्षा, विशेष मार्गदर्शन वर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास यामुळे हा उत्कृष्ट निकाल लागल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.या यशस्वी निकालाबद्दल संस्थापक अध्यक्ष , उपाध्यक्ष ,सचिव , खजानिस संचालक मंडळ वर्गशिक्षक-श्री अनिल पांडुरंग चौगुले, श्री चंद्रकांत भिमराव कुंभार मुख्याध्यापक श्री सुभाष सदाशिव पाटील तसेच वर्ग शिक्षक यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Leave a Comment

error: Content is protected !!