थोरात गॅस वितरण कंपनीच्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने मोठा स्फोट

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी

पुणे बंगलूरु राष्ट्रीय महामार्गालगत शिरोली औद्योगिक वसाहतीतील आयडीबीआय बँकेच्या शेजारी असणाऱ्या महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट जवळ असलेल्या महाराष्ट्र गॅरेज मध्ये थोरात गॅस वितरण कंपनीच्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने मोठ्या परिसरात मोठा स्फोट झाला. ही घटना आज शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळाली माहिती अशी की महाराष्ट्र गॅरेज मध्ये थोरात गॅस वितरण कंपनीच्या ट्रक लावण्यात आला होता.आज दुपारी गॅरेज मध्ये अचानकपणे दूर येऊ लागला काही वेळात मोठ्या स्फोट झाला.या स्फोटात ट्रक व गॅरेजमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून गॅरेजचे मोठे नुकसान झाले आहे.गॅरेज मध्ये कोणी नसल्याने सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.त्यामुळे मोठ्ठा अनर्थ टळला.दरम्यान आग विझवल्यानंतर।पाहणी केली असता एक गॅस सिलेंडरचा पण स्फोट झाल्याचे पहायला मिळाले. या घटनेची नोंद सायंकाळी साडे चार वाजेपर्यंत शिरोली पोलिसात झाली नव्हती,नेमका स्फोट कशाने झाला अशी माहिती उपलब्ध झाली नाही.

error: Content is protected !!