हातकणंगले / प्रतिनिधी
महाराष्ट्रासह कर्नाटक येथील भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या आळते ( ता.हातकणंगले ) येथील श्री रेणूका देवीची यात्रा १४ व १५ डिसेंबरला.असे दोन दिवस संपन्न होते.आळते येथील रेणुका देवीची यात्रा दिनांक १ ४ व १५ डिसेंबर असे दोन दिवस चालणार असून यात्रेचा मुख्य दिवस रविवार १५ डिसेंबर असणार आहे. रेणूका देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकमधून हजारो भक्त आळते येथे येत असतात. यात्रा काळात आळते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यात्रेकरूसाठी पिण्याच्या पाण्याची,लिंब नेसणाऱ्या भक्तांसाठी आंघोळीसाठी पाण्याची सोय, तसेच आळते आरोग्य विभागाच्या वतीने प्रथम उपचार म्हणून डॉक्टरांची टिम यात्रा काळात उभी असणार आहे. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात येणार आला आहे मंदिराची रंगरंगोटी, मंदिर परिसरातील स्वच्छता व यात्रेवेळी येणारे खेळण्याची दुकान, पाळणे, मिठाई दुकान व भक्तांना राहाण्यासाठी जागेची ग्रामपंचायती मार्फत आखणी केली असून. यात्रेची पूर्ण तयारी झाली आहे. १५डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे. हया दिवशी रात्री पालखी सोहळा संपन्न होऊन शुक्रवारी पहाटे बांगडया वाढविण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर यात्रेची सांगता होणार असल्याची माहीती रेणूका मंदिराचे पुजारी प्रदिप कदम यांनी सांगितले.