माणुसकीचा ‘आनंदसोहळा’! हेरवाडच्या गुरव दाम्पत्याने मेव्हणीच्या मुलीचे कन्यादान करून समाजासमोर ठेवला आदर्श

हेरवाड  / दिलीप शिरढोणे आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक आणि महागाईच्या युगात प्रत्येक व्यक्ती स्वतःचा संसार सांभाळताना अक्षरशः थकून जात आहे. वाढत्या खर्चामुळे अनेकांना स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागवणेही अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे, त्यांच्या संकटात आधार बनणे आणि त्यांचे आयुष्य उभे करण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा काही भाग अर्पण करणे, ही गोष्ट आता दुर्मिळ होत … Read more

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर ४ तास वाहतूक कोंडी

 पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथील उड्डाणपुलावर आज सायंकाळी चार वाजण्यासुमार एका अज्ञात वाहनाने मालवाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली होती.मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीतून … Read more

छत्रपती शंभूराजेंच्या भव्य शिल्पामुळे शिरोळच्या इतिहासाला मिळाला उजाळा : आ.राजेंद्र पाटील यड्रावकर

शिरोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाचे मोठ्या उत्साहात अनावरण शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य शिल्प उभारल्याने इतिहासाला नव्याने उजाळा मिळाला आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे उभारण्यात … Read more

रेडिमिक्सर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार , तर एकजण गंभीर जखमी

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीसमोर दुपारी ३ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या रेडिमिक्सर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली , तर एकजण गंभीर जखमी झाला. मयत महिला ही नवे पारगाव गावची असून ती लिफ्ट घेवून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात होऊन … Read more

स्मँक येथे शुक्रवारी’आरोग्य, सदाचार आणि व्यसनमुक्ती’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक) संचलित श्रीमती सोनाबाई शं. जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र व स्व. जवानमलजी गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, नागांव यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या व्याख्यानाचे आयोजन कै. सुनिल जनवाडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ करण्यात आले आहे ‘आरोग्य, … Read more

राष्ट्रसेवा प्रशाला पुलाची शिरोली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील राष्ट्रसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राष्ट्रसेवा प्रशाला पुलाची शिरोली या शाळेने दहावी परीक्षेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत शाळेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा राखली या प्रशालेचा १००% टक्के निकाल लागला असून साई संदीप यादव याने ९१.८०% टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक , तनुष्का महेश … Read more

पुलाची शिरोलीत १६ ते १८ मे दरम्यान ‘महासंग्राम’ कबड्डी स्पर्धेचा थरार

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे पुलाची शिरोली येथे सर्वेश्वर कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने ७० किलो वजनी गटातील भव्य ‘महासंग्राम’ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्पर्धा दि. १६ मे ते १८ मे २०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सायंकाळच्या सत्रात … Read more

पुलाची शिरोली येथे शुक्रवारी हिंदू जनआक्रोश सभेचे आयोजन

पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे पुलाची शिरोली परिसरातील काही तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून बदनामी करण्यात आल्याच्या कथित प्रकाराच्या निषेधार्थ पुलाची शिरोली येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हिंदू जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नवभारत क्रीडा मंडळाच्या पटांगणावर ही सभा होणार असून, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी … Read more

दत्तवाड ग्रामीण रुग्णालय परिसरात मधमाश्यांचा थरार; रुग्णांसह नातेवाईकांची जीव वाचवण्यासाठी पळापळ

हेरवाड / प्रतिनिधी  दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात अचानक मधमाश्यांच्या थव्याने हल्ला चढवल्याने मोठी खळबळ उडाली.या हल्ल्यामुळे उपचारासाठी आलेले रुग्ण,त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची प्रचंड धावपळ झाली. मधमाश्यांच्या दंशामुळे काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून, परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हे रुग्णालय येथील … Read more

पंचगंगा नदी बचाव संघर्ष समितीला यश,तेरवाड बंधाऱ्यावरील जलपर्णी हटवण्याची मोहीम सुरू जेसीबी,तीन ट्रॅक्टर तैनात

हेरवाड / प्रतिनिधी  तेरवाड बंधाऱ्यावर जलपर्णीच्या समस्येने रौद्र रूप धारण केले आहे.ही जलपर्णी तातडीने हटवण्यासाठी आता प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी जलपर्णी सात दिवसात हटविण्याचे निर्देश संबंधिताना दिले होते.मंगळवार पासून तेरवाड बंधारा येथे जलपर्णी काढण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.एक जेसीबी,चार ट्रॅक्टरच्या साहाय्याने जलपर्णी काढणेत येत आहे.इचलकरंजी प्रोसेस … Read more