रामलिंग उपसा सिंचन योजनेला मोठा दिलासा ; सर्वेक्षणासाठी २.१८ कोटींचा निधी मंजूर – आमदार डॉ.अशोकराव माने

आमदार विनय कोरे यांच्या पाठपुराव्याला यश ; शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले तालुक्यांतील १३ हजार हेक्टर क्षेत्राला होणार लाभ शिरोळ / प्रतिनिधी जनसुराज्य पक्षाचे नेते,माजी मंत्री तथा शाहुवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनयरावजी कोरे (सावकार) यांच्या सातत्यपूर्ण आणि अथक प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून शाहुवाडी,पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रामलिंग उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षण, अन्वेषण आणि … Read more

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आमदार डॉ.अशोकराव माने यांच्याकडून सत्कार

शिरोळ / प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उपस्थित राहून विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांनी गोवा येथे सदिच्छा भेट घेत सत्कार करून आभार व्यक्त केले. निवडणूक काळात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत आमदार डॉ.अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली होती.त्यांच्या … Read more

शिरोळभूषण पुरस्काराने कर्तृत्ववानांचा होणार गौरव – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव

जयसिंगराव पाटील, खंडेराव जगदाळे यांना प्रतिष्ठानचा सन्मान; प्रवीण चुडमुंगे यांचाही विशेष गौरव शिरोळ / प्रतिनिधी  आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिरोळभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून यंदाच्या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले निवृत्त पोलीस उपअधीक्षक जयसिंगराव पाटील तसेच … Read more

भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरणासाठी शिरोळ नगरपरिषदेची व्यापक मोहीम सुरू – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव

शिरोळ / प्रतिनिधी गेल्या पाच-सहा वर्षांपासून शिरोळ शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी गंभीर समस्या बनत चालला आहे.शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे.विशेषतः सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणारे ज्येष्ठ नागरिक,महिला, शालेय विद्यार्थी आणि लहान मुलांना या कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अनेक वेळा … Read more

कच्च्या तेलाचे दर निम्म्यावर तरीही इंधन महागच शिरोलीत काँग्रेसचे भाजप सरकारविरोधात जोरदार आंदोलन

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निम्म्याने घसरले असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी न केल्याच्या निषेधार्थ आज शिरोली सांगली फाटा येथील कोरगांवकर पेट्रोल पंप आणि शेतकरी संघाच्या पंपावर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनतेची लूट थांबवून इंधनाचे … Read more

‘दर’ ठरल्यानंतर काम पुन्हा सुरू होण्याचा अंदाज, टक्केवारीच्या वादात पाणीपुरवठा योजना व शिरोळची विकासकामे रखडली की काय ? शहरात चर्चा

शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ शहरासाठी मोठ्या प्रयत्नांनंतर मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना सध्या ठप्प अवस्थेत असून,या योजनेच्या बंद पडण्यामागे टक्केवारीचा वाद कारणीभूत असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.संबंधितांचा हिस्सा निश्चित झाल्यानंतरच योजना पुन्हा सुरू होईल, असा अंदाज नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. शिरोळ शहरातील काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की,नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर … Read more

थ्री वॉरियर्सचा महासंग्रामावर कब्जा; शिवमुद्रा रोहिदासवर २९-२३ अशी मात

 पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे पुलाची शिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या “कबड्डी महासंग्राम २०२६” स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रंगतदार वातावरणात पार पडला. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झालेल्या या थरारक अंतिम लढतीत थ्री वॉरियर्स संघाने दमदार खेळ करत शिवमुद्रा रोहिदास संघावर २९-२३ अशी मात करून विजेतेपद पटकावले. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत सामना चुरशीचा केला. … Read more

“धक्कादायक” शिरोळ नगर परिषदेकडील पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा बोजवारा, रखरखत्या उन्हात तहानले नागरिक

शिरोळ / प्रतिनिधी  एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे शिरोळ नगर परिषदेमध्ये येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत असल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे.सर्वसामान्य नागरिक,महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांना तहान भागवण्यासाठी नगर परिषद कार्यालयात कोणतीही सक्षम व्यवस्था नसल्याने प्रशासनाच्या अनास्थेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.शिरोळ नगर परिषदेकडून कार्यालयाबाहेर नागरिकांसाठी फिल्टरयुक्त पिण्याच्या पाण्याची … Read more

“ब्रेकिंग बातमी” सातबारा नोंदीसाठी ६० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात

शिरोळ / प्रतिनिधी  कोर्टाच्या हुकूमनाम्यानुसार सातबारावर नाव नोंद करून देण्यासाठी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.ही कारवाई सोमवार (दि.१८) नांदणी येथे करण्यात आली.याप्रकरणी अमितकुमार जगन्नाथ पाडळकर (वय ४४, मंडळ अधिकारी, नृसिंहवाडी,अतिरिक्त कार्यभार नांदणी आणि शिवाजी आनंद जाधव (वय … Read more

पुलाची शिरोली प्रो कबड्डी लीगमध्ये शिवमुद्रा रोहिदास, शिवसाई इलेक्ट्रिकलचा दमदार खेळ

 पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे पुलाची शिरोली येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत दुसऱ्या दिवशी रंगलेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कंठावर्धक चढाओढ करत प्रेक्षकांची मने जिंकली. सायंकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यांमध्ये अनेक संघांनी शानदार खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळवला. विशेषतः शिवमुद्रा रोहिदास, शिवसाई इलेक्ट्रिकल आणि बाळूमामा चॅम्पियन या संघांनी प्रभावी कामगिरी करत स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला.सायंकाळच्या … Read more