निमशिरगाव येथे गावठी दारू हातभट्टीवर पोलिसांचा छापा; १ लाख ८६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जयसिंगपूर / प्रतिनिधी  निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील शेतामध्ये सुरू असलेल्या गावठी दारू हातभट्टीवर जयसिंगपूर पोलिसांनी धाड टाकून तब्बल १ लाख ८६ हजार ९०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत निमशिरगाव येथील चांभार कोडी परिसरातील रमेश सिताराम कांबळे यांच्या शेतातील गट क्रमांक ३०४ … Read more

अनुसूचित जातीच्या एकजुटीविरोधातील उपवर्गीकरणाला तीव्र विरोध – आम. अशोकराव माने

अनुसूचित जातीच्या एकजुटीविरोधातील उपवर्गीकरणाला तीव्र विरोध – आम. अशोकराव माने, मुंबईत मागासवर्गीय समाजाचा विराट मोर्चा, सरकारला आक्रमक इशारा मुंबई / प्रतिनिधी  अनुसूचित जातीची एकजूट अबाधित राहावी आणि जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज मुंबईत संपूर्ण राज्यातील मागासवर्गीय समाजाचा विराट मोर्चा मोठ्या संख्येने व आक्रमक पवित्र्यात पार पडला. राज्यभरातून हजारो समाजबांधव, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते … Read more

अज्ञात कारखान्यांचा प्रदूषणाचा कहर! मळीमिश्रित सांडपाण्याने नदी गुदमरली; हजारो मासे मृत, नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका

शिरोळ | प्रतिनिधी मगावती ते कागवाड बायपास मार्गावरील ओढ्यामार्फत अज्ञात कारखान्यांकडून मळीमिश्रित व रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही प्रक्रिया न करता हे दूषित पाणी ओढ्या-नाल्यांच्या माध्यमातून नदीत सोडले जात असल्याने परिसरातील जलप्रदूषणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या प्रदूषणामुळे नदीतील हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने पर्यावरणप्रेमी आणि … Read more

तांदुळवाडीसारख्या दुर्घटनेनंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का?; ‘एस कॉर्नर’जवळील उघडी विहीर ठरतेय मृत्यूचा सापळा!

तांदुळवाडीसारख्या दुर्घटनेनंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का?; सुरक्षा कठडे उभारण्याची नागरिकांची आक्रमक मागणी माणकापूर / दिलीप शिरढोणे  माणकापूर – रांगोळी मार्गावरील ‘एस कॉर्नर’जवळ रस्त्यालगत असलेली उघडी विहीर सध्या वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहे.माणकापूर फाट्यापासून अवघ्या ५० फुटांवर आणि रस्त्यापासून केवळ ३ ते ४ फुटांच्या अंतरावर असलेल्या या खोल विहिरीभोवती कोणतेही सुरक्षा कठडे,संरक्षक भिंत किंवा … Read more

वारस नोंदीसाठी २ हजारांची लाच घेताना शिरोळ भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार एसीबीच्या जाळ्यात

शिरोळ / प्रतिनिधी वारस व फेरफार नोंद करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, शिरोळ येथील निमतानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे सरकारी कार्यालयांतील लाचखोरीविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.संजय बापू तेली (वय ५२, रा.आळते, ता. हातकणंगले, … Read more

हक्काचे भूखंड द्या; अन्यथा आंदोलन तीव्र करू – आगर ग्रामस्थांचे शिरोळ तहसीलसमोर बेमुदत धरणे

शिरोळ / प्रतिनिधी  मौजे आगर (ता. शिरोळ) येथील शासकीय गट क्रमांक ८१३ मधील मंजूर भूखंडधारकांना अद्यापही प्रत्यक्ष भूखंडाचा ताबा मिळालेला नसल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारपासून शिरोळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.मंजुरी यादीतील लाभार्थ्यांच्या भूखंडांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून कब्जे हक्काची रक्कम स्वीकारून त्वरित भूखंडांचे वाटप करण्यात यावे,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा … Read more

शिरोळ पालिकेकडून ‘श्री बुवाफन नगर’ नामकरणास मंजुरी; नागरिकांच्या मागणीला अखेर यश

शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ शहरातील अर्जुनवाड रस्त्यालगत असलेल्या नागरी वस्तीला ‘श्री बुवाफन नगर’ असे नामकरण करण्यास शिरोळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाला असून, सोमवारी नगरपालिकेच्या मंजुरीच्या ठरावाची प्रत नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आली. या नामकरणासाठी नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सौ अनिता संकपाळ आणि नगरसेवक … Read more

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज; शिरोळमध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत वडाच्या वृक्षांचे रोपण

शिरोळ / प्रतिनिधी  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वाढत्या प्रदूषणावर प्रभावी उपाय म्हणून वृक्षारोपणाला पर्याय नाही. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला, तर भावी पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध पर्यावरण निर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन शिरोळ नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.कल्पना पंडित काळे यांनी केले. शिरोळ नगरपालिकेच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ … Read more

राष्ट्रीय पोलिओ दिनानिमित्त पुलाची शिरोलीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे “दोन थेंब जीवनाचे, उज्ज्वल भविष्याचे” या घोषवाक्याखाली राष्ट्रीय पोलिओ दिनानिमित्त पुलाची शिरोली येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात झाला. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह व विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात लोकनियुक्त महिला सरपंच सौ. पद्मजा कृष्णात करपे व तालुका पंचायत सदस्या सौ. कमल प्रकाश कौंदाडे यांच्या हस्ते पाच वर्षांखालील … Read more

बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी पोलिओ लस आवश्यक : सौ. कल्पना काळे

शिरोळ शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात; पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिरोळ / प्रतिनिधी पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस देणे अत्यंत आवश्यक असून, बालकांच्या सुदृढ व निरोगी भविष्यासाठी पालकांनी लसीकरणाबाबत जागरूक राहावे, असे प्रतिपादन शिरोळ नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. कल्पना पंडित काळे यांनी केले. शिरोळ … Read more