रोटरी क्लबच्या माध्यमातून माझ्या गावच्या शाळेला नेहमीच मदतीचा हात – उद्योगपती अजित टारे

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी

रोटरी क्लबच्या माध्यमातून माझ्या गावच्या शाळेला नेहमीच मदतीचा हात देत असतो माझे गाव माझी शाळा हेच धोरण मनात बाळगूण आळते हायस्कूल जे काही देता येईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो असे प्रतिपादन उद्योगपती अजित टारे यांनी केले.ते आळते ता. हातकणंगले येथे बाळासाहेब पाटील (दादा) हायस्कूल व भाऊसो चौगूले बालविद्या मंदिरच्या वार्षिक स्नेहसंमेलन व परितोषिक वितरण समारंभात बोलत होते.यावेळी शिक्षक नेते दादासो लाड म्हणाले ‘ काहीतरी नात या शाळेशी जोडले आहे या शाळेबद्दल नेहमीच आपूलकी तळमळ राहीली आहे ‘ शाळेने कमावलेले नाव यामुळे मनस्वी आनंद होतो.या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे चेअरमन संजयकुमार पाटील यांनी आपल्या मनोगता मध्ये शाळेचा प्रगतीचा आढावा उपस्थिता समोर मांडला ‘ या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.बी शिखरे यांनी मांडले.याकार्यक्रमास उपसरपंच अमित पाटील ‘ सुदर्शन संकाण्णा .अविनाश मजलेकर ‘ आण्णासो अंकलीकर ‘ सुरज संकाण्णा ‘ महाराष्ट्र पत्रकार संघाचे माजी तालूका अध्यक्ष सुकुमार अब्दागीरे ‘ माजी सरपंच रामदास हांडे ‘ भुपाल पाटील ‘ गणेश खटावकर, सौ हातगिणे मॅडम ‘ सौ पाटील मॅडम बी डी केंगाळे सर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. शेवटी आभार जितेंद्र कांबळे यांनी मानले

error: Content is protected !!