पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील कोल्हापूर अॅक्सलच्या मागिल एम के पॉलिमर्स या फायबर कोटींग पत्रा तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागून जवळपास एक कोटीचे नुकसान झाले हि आग कशाने लागली हे अद्याप ही समजू शकले नाही घटनास्थळी कोल्हापूर व पेठवडगाव अग्निशमन बंबाच्या जवानांनी धाव घेवून आग आटोक्यात आणली . तर शिरोली येथील विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत विज बंद करून तत्परता दाखवली
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील कोल्हापूर अॅक्सलेच्या मागिल बाजूस असणाऱ्या शिवानंद हाॅटेल शेजारी एम के पॉलिमर्स हि दुमजली कंपनी असून कंपनीच्या खालील मजल्यावर कंपनीचे तयार झालेले मटेरीयल डिस्पॅच करण्यासाठी वापरतात तर वरच्या मजल्यावर कंपनीचे पत्रा तयार करणाऱ्या मशनरी व महागडे केमिकलयुक्त साहित्य असल्याने वरच्या मजल्यावर मागिल बाजूस आग लागली ही आग आज सोमवारी सायंकाळी ६ वाजण्यासुमार लागल्याने मोठी तारांबळ उडाली कारण औद्योगिक वसाहतीमध्ये दीपावली निमित्त सर्व उद्योग बंद असल्याने लोकांची रहदारी कमी प्रमाणात असल्याने काही नागरिकांना कोणस फोन करावा हे सूचत नव्हते पण घटनास्थळी आग पहाण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने शिरोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसाना माहिती देताच पोलीस घटनास्थळी धाव घेवून पहाणी केले व त्यानीच कोल्हापूर व पेठवडगाव येथील अग्निशमन कार्यालयाशी संपर्क साधून घटनेबाबत माहिती देताच दोन्ही आग्णीशमनच्या गाड्या घटनास्थळी धाव घेवून आग आटोक्यात आणली .
हि आग वरच्या मजल्यावर आगल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागली कारण चारही बाजूंनी भिंती असल्याने पाण्याचा मारा आता करता येत नव्हता त्यामुळे शेजारील इमारतीवर जावून खिडक्कीच्या काचा फोडून पाण्याचा मारा केल्याने जवळपास दोन तासाच्या परिश्रमाने हि आग आटोक्यात आली . हि आग पेठवडगाव येथील अग्निशमन दलाचे जवान अनिकेत पाटील , सुरज पाटील , वैभव शिंदे , तर कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे उमेश जगताप , प्रमोद मोरे, आकाश जाधव यानी मोठे परिश्रम घेवून
आग आटोक्यात आणली तर विज वितरण कंपनीचे वायरमन युवराज जाधव , शेखर चव्हाण, परवेज फकीर , यानी वेळेत विज कनेक्शन बंद करून तत्परता दाखवली यावेळी घटनास्थळी नागरिकांनी बघ्याची गर्दी केली होती.