नांदणी नाका लमाण वसाहत धरणगुत्ती इसम बेपत्ता

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

सुभाष इराप्पा राठोड़, वय वर्ष 47 ,विवाहित ,राहणार नांदणी नाका लमाण वसाहत,धरणगुत्ती ता.शिरोळ जिल्हा कोल्हापुर ,व्यवसाय डंपर ,ट्रक ड्रायव्हर हा आपल्या लमाण वसाहत येथील राहत्या घरातून मालिंगपुर ता.जमखण्डी ,जिल्हा बागलकोट येथे गावाकडे जातो म्हणून गेला तो अद्याप परतला नाही.9 फब्रूवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता तो निघुन गेला आहे.किरण कृष्णाप्पा चव्हाण रा. लमाण वसाहत धरणगुत्ती यांनी शिरोळ पोलीसात वर्दी दिली आहे.सुभाष राठोड याने घरातून जाताना मोबाइल घरी सोडून गेला आहे.दरम्यान 10 फेब्रुवारी रोजी सकाळी गावाकडे फोन वरुन संपर्क साधुन सुभाष गावी आला आहे का याबाबत विचारपुस केले असता सुभाष राठोड याचे वडील इराप्पा राठोड यानी सुभाष गावी आला नसल्याचे सांगितले.तर सुभाष गावाकडे पोचला नसल्याने नातेवाहिकांनी प्रथमतः इतरत शोध घेतला. गावाकडे मित्र मंडळी व सगळी कडे संपर्क केला मात्र मिळून आला नाही.घरातून जाताना त्याच्या अंगावर पिवळा टी शर्ट ,काळया रंगाची पॅन्ट ,पायात साधे चप्पल ,ऊंची 6 फुट ,अंगाने सडपातळ ,रंगाने नीम गोरा ,नाक सरळ ,केस काळे ,डोक्यावर वरील बाजूस माथ्याजवळ टककल पडलेले आहे.लमाण ,कन्नड़ ,मराठी भाषा बोलतो.सदर वर्णनाची व्यक्ति कोणास आढळून आल्यास शिरोळ पोलीस ( 02322 236433 ) यावर संपर्क साधावा असे आवाहन शिरोळ पोलीसानी केले आहे.

error: Content is protected !!