इचलकरंजी शहरातील शांतीनगर परिसरामध्ये कत्तलखान्या जवळ असणाऱ्या कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये एका युवकाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली आहे.याची माहिती गावभाग पोलिसांना मिळताच घटनास्थळी गावभाग पोलीस व DYSP समीरसिंह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पाहणी करून तपासाची पथके रवाना केली आहेत अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे.