फळबाग पिकासाठी शास्त्रीय पद्धतीने लागवड कशी करावी याचे कृषिकन्यांकडून प्रात्येक्षिक

Spread the love

ग्रामीण कृषि जागरूकता,कृषी कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत शरद कृषि महाविद्यालय, जैनापुर येथील कृषिकन्या तेजस्विनी खोले, रसिका पाटील, ऋतिका पाटील,योगिता पुजारी, तेजस्विनी रजपूत, सोनाली रोकडे यांनी जुने दानवाड येथे फळबाग पिकासाठी खड्डे खोदणे आणि भरणेच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात केले होते.फळबाग पिकासाठी शास्त्रीय पद्धतीने लागवड कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.तसेच फळबाग लागवड करताना कोणती काळजी घ्यावी हेही सांगितले.यावेळी त्यांनी केसर जातीच्या आंबा लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविले. या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
या प्रात्यक्षिकास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.जे. पाटील,उपप्राचार्य व कार्यक्रमाचे प्रमुख प्रा.एस. एच. फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. टी. कोळी व कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. व्ही.आवळे, विषय शिक्षक प्रा. ए. एस. माळी यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!