विजेच्या धक्क्याने वानराच्या पिलाचा दुर्दैवी मृत्यु

Spread the love

शिरटी / प्रतिनिधी

विद्युत तारास स्पर्श झाल्याने एका वानराच्या पिलाचे जागीच मृत्यू झाल्याची घटना शिरटी (ता शिरोळ )येथे बुधवारी सकाळीच्या सुमारास घडली.अचानक घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.यावेळी माणुसकीच्या भावनेतून तरुण प्राणिमित्रानी मृत वानराच्या पिलास विधिवत दफन केले.

 

शिरटी गावात डॉ,बाबासाहेब आंबेडकर चौकातील मेन डिपी लगत असलेल्या झाडावर गेल्या काही दिवसांपासून जवळपास पंधरा ते वीस वानरांचा घोळका असतो.दिवसभर हे घर ते घर अशा प्रकारे उड्या मारतात,मात्र आतापर्यंत नागरीकांना त्या वानरांनी त्रास दिला नाही.आज सकाळी दहाच्या सुमारास खेळत

 

असताना मुख्य वीज प्रवाहाच्या तारेस वानराच्या लहान पिलाचा स्पर्श झाल्याने त्यास विजेचा जोराचा झटका बसला त्यात ते पिल्ले जागीच ठार झाले.आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे पाहून इतर वानरे एकत्र येऊन मृत पिलाजवळ बसलेले दृश्य पाहुन ग्रामस्थांचे ही डोळे पाणावले.यावेळी उपस्थित तरुण प्राणिमित्रानी

 

पुढाकार घेऊन विधी प्रमाणे वानराचा पिलास दफणविधी केले.यावेळी अनिकेत कांबळे,शुभम भोसले,अभिजीत भोसले,वैभव कांबळे,महावीर मगदुम,मनोज कांबळे,वैभव पवार,जोतिबा भंडारे,प्रेम कांबळे,सौरभ कांबळे,गौस मुल्लाणी,सचिन डोईजड,अभिजित होरे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!