शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरातील प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत जय हिंद नगर परिसरात गेल्या सुमारे तीस वर्षांपासून रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेले दोन विजेचे पोल अखेर स्थलांतरित करण्यात आला आहे. नगरसेविका सौ.श्वेता संतोष जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे हे रखडलेले काम पूर्णत्वास गेले असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.जय हिंद नगरमधील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असलेला विजेचा पोल वाहतुकीस अडथळा ठरत होता.तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीनेही धोकादायक बनले होता.अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने स्थानिक नागरिकांकडून वारंवार मागणी केली जात होती.मात्र विविध कारणामुळे या कामाची पूर्तता होत नव्हती.नगरसेविका सौ.श्वेता संतोष जाधव यांनी हा प्रश्न प्राधान्याने हाती घेत संबंधित विभागांशी सातत्याने संपर्क साधला.त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईबी), शिरोळ नगरपरिषद तसेच स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने विजेचा पोल सुरक्षितपणे बाजूला स्थलांतरित करण्यात आला.याबाबत प्रतिक्रिया देताना सौ.श्वेता जाधव म्हणाल्या, निवडणुकीच्या वेळी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.जय हिंद नगरमधील हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि संबंधित विभागांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हे काम पूर्ण करता आले, याचे समाधान वाटते.या कामामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेतही वाढ होणार आहे.दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने जय हिंद नगरमधील नागरिकांनी नगरसेविका सौ.श्वेता संतोष जाधव यांचे आभार व्यक्त केले आहेत.तसेच परिसराच्या विकासासाठी भविष्यातही अशाच प्रकारे लोकहिताची कामे हाती घेण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.