युवा उद्योजक धनंजय देसाई यांची शिरोळ शहर काँग्रेस अध्यक्षपदी निवड, काँग्रेसला मिळाले सक्षम व युवा नेतृत्व; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शिरोळ शहरात नव्या व युवा नेतृत्वाला संधी देत युवा उद्योजक धनंजय अरुण देसाई यांची काँग्रेस (आय)च्या शिरोळ शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.या निवडीमुळे शिरोळ शहरात काँग्रेस पक्षाला नवचैतन्य मिळाले असून कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.धनंजय देसाई हे सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवकांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या नेतृत्वगुणांचा विचार करून काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शिरोळ शहरातील युवक,विद्यार्थी,शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांच्या विविध समस्या व मागण्या प्रभावीपणे मांडण्यासाठी धनंजय देसाई यांचे नेतृत्व उपयुक्त ठरेल,असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. शहराच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सक्रियपणे काम करतील,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाल्याने धनंजय देसाई यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.शांत संयमी आणि शिरोळ शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकासाभिमुख समाजकारण करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.या नियुक्तीमुळे काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असून आगामी काळात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी धनंजय देसाई यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरणार आहे.नव्या जबाबदारीमुळे शिरोळ शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवउमेद निर्माण झाली असून पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी ही नियुक्ती सकारात्मक आणि आशादायी मानली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!