सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या सोबत – युवा जिल्हाध्यक्ष रोहित पाटील

Spread the love

सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या सोबत – युवा जिल्हाध्यक्ष रोहित पाटील

राजापूर / प्रतिनिधी

सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारा आणि तळागाळात रुजलेला पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या सोबतच आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रोहित दादा पाटील यांनी केले. ते राजापूरवाडी व राजापूर येथील शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होते.ते पुढे म्हणाले कि,शरद पवार यांनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव त्यांना असल्याने राष्ट्रवादी पक्ष सर्वांनाच आपला स्वतःचा पक्ष वाटतो.म्हणून आज सत्ता नसली तरी सर्वसामान्य जनता शरद पवार साहेबांच्या सोबत आहे.आज वयाच्या ८४ व्या वर्षीही तरुणाला लाजवेल.असे उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याचा वसा घेवून तळागाळातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यानी कामास लागावे असे आवाहन हेरवाडचे सरपंच वसंतराव देसाई यांनी केले.शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे म्हणाले, शरद पवार यांचे विचार तळागाळात पोहचविण्यासाठी गाव तेथे शाखा ही संकल्पना राबवून तालुक्यातील गावागावात राष्ट्रवादीच्या शाखा सुरु करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी शिरोळ तालुका राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा स्नेहा देसाई,सरचिटणीस वैशाली कोरूचे,कार्याध्यक्षा सुजाता अशोक पाटील,सदस्या तेजस्विनी देसाई,सुमन चव्हाण,बी.जी.माने,मौलाअली पटेल,शाहिर आवळे,दिनेश कांबळे,सरपंच गीता दिवटे मॅडम,माजी सरपंच दानू उर्फ शंकर पाटील,शहाजान जमादार,दुंडाप्पा मगदूम,गिरीश पाटील,दत्तात्रय कदम,किरण कोळी,सचिन पाटील,इसाक एकसंबे यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!