शेतकऱ्याला अर्वांच्य शब्दांत शिवीगाळ करणारे दरगु गावडे यांच्यावर कारवाई आणि शेतकऱ्याला पोलीस संरक्षणाची अंकुश संघटनेची मागणी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ येथील शेतकरी राहूल माने यांच्यावर दरगु गावडे यांनी अर्वांच्य शब्दांत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंकुश संघटनाच्या वतीने शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्याकडे निवेदन दाखल केले असून, दरगु गावडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आणि राहूल माने यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.माहितीनुसार,राहूल माने गेल्या आठ दिवसांपासून आपल्या उसाचा तोड मिळवण्यासाठी दत्त साखर कारखान्याच्या स्लिप बॉय व शेती मदतनीसांकडे विनंती करत होते. कारण, ज्यांच्या रानातून ऊस काढला जाणार होता, त्यांचा ऊस तुटून जास्त दिवस झालेले होते आणि त्यांनी रान नांगरले नसल्यामुळे दुसरी वाट उपलब्ध नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन राहूल माने यांनी चेअरमन गणपत दादा पाटील यांना फोन करून ऊस तोडण्याची कल्पना मांडली.यानंतर दरगु गावडे यांचा राहूल माने यांना फोन आला आणि त्यांनी “फोन का केला?” असे विचारले.काही वेळाने पुन्हा फोन करून अत्यंत खालच्या भाषेत अर्वांच्य शिवीगाळ केली. निवेदनात म्हटले आहे की, राहूल माने यांनी मदत मागितली नसतानाही आणि दरगु गावडे यांचा कोणताही संबंध नसतानाही चेअरमनशी संपर्क केल्याबद्दल धमकी देणे ही गुंडगिरी आहे.राहूल माने यांनी शिरोळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, निवेदनात दरगु गावडे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात कुठल्याही शेतकऱ्यावर अशा प्रकारची दादागिरी होऊ नये.तसेच,राहूल माने यांना डाव धरून दादागिरी किंवा मारहाण होण्याचा धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.ही मागणी जिल्हा पोलीस प्रमुख,कोल्हापूर, अतिरिक्त पोलीस प्रमुख, इचलकरंजी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर यांनाही पाठवण्यात आली आहे. दरम्यान याबाबत दरगू गावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!