आलास / प्रतिनिधी
आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार दादेपाशा पटेल यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार बुबनाळ येथे आयोजित मतदारांच्या बैठकीत करण्यात आला.दादेपाशा पटेल यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यात कधीही जात,धर्म,गट-तट यांचा विचार न करता मानवधर्माला सर्वोच्च स्थान दिले आहे. २०१९ व २०२१ मध्ये आलेल्या भीषण महापुराच्या काळात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले.अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे,अन्नधान्य व औषधोपचार पोहोचवणे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.त्यांच्या या निस्वार्थ सेवेची उतराई आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील जनता मतपेटीतून नक्कीच करेल,असा विश्वास उपस्थित मतदारांनी व्यक्त केला.जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ.परविन पटेल यांनी आपल्या कार्यकाळात सुमारे २४ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत.रस्ते, पाणीपुरवठा,आरोग्य सुविधा,शाळा आणि मूलभूत सोयीसुविधांच्या माध्यमातून त्यांनी विकासाभिमुख लोकप्रतिनिधी अशी ठाम प्रतिमा निर्माण केली आहे.त्यांच्या कामातील पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा जनतेच्या विश्वासास पात्र ठरला आहे.दादेपाशा पटेल यांची प्रतिमाही पूर्णपणे स्वच्छ असून पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी कुणालाही बुडवलेले नाही,कर्ज देताना डबल व्याज आकारलेले नाही.तसेच गोरगरीब नागरिकांच्या घरकुल योजनांमध्ये कोणताही गैरव्यवहार किंवा घोटाळा झालेला नाही.त्यामुळे प्रामाणिक, विश्वासार्ह आणि विकासाभिमुख उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातून दादेपाशा पटेल यांना सर्वाधिक मतदान मिळावे यासाठी बैठका व जनसंपर्क मोहीम राबवली जात असून,या बैठकींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.यावेळी दादेपाशा पटेल म्हणाले, जनतेने आजपर्यंत माझ्यावर दाखवलेला विश्वास, कार्यकर्त्यांची मते आणि मनं यांची जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन.मला संधी मिळाल्यास आलास जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करून जनतेची भूमिका नक्कीच सार्थ ठरवेन असा विश्वास व्यक्त केला.