महिलांनीन घाबरता व्यवसायाकडे वळावे – चेतन नरके

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

महिलांनीन घाबरता व्यवसायाकडे वळावे कारण महिलांच योग्य नियोजन करण्यात सक्षम असते , व्यवसाय करताना पहिल्यांदा बाजार पेठेचा सुक्ष्म आभ्यास करणे महत्वाचे असते कारण आपण तयार केलेला माल हा योग्य बाजारामध्ये जाऊन योग्य तो मोबदला मिळणे फार गरजेचे असते असे प्रतिपादन अरुण नरके फाऊडेशन चे सर्वसर्वा चेतन नरके यांनी केली.ते हातकणंगले येथे तहसिल कार्यालया मध्ये आयोजीत जिल्हा उद्योग केन्द्र व अरुण नरके च्या मार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व महिला उद्योजकीय मेळाव्यात बोलत होते.बोलताना पुढे म्हणाले आत्ता पर्यंत नरके फाऊडेशन च्या मार्फत जवळपास 5300 विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू आहेत गेली 30 वर्ष हे फाऊडेशन कार्यरत आहेत , महिलाची कष्ट करण्याची तयारी फार मोठी असते तसेच चिकाटी पण चांगली असते व्यवसायाला बळ देण्यासाठी या दोन्ही गोष्टी असणे आवश्यक असते. व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक असते ‘ किमान व्यवसाया बद्दल नसेल तर ट्रेनिंग घेणे केव्हाही चांगले , छोटा व्यवसायातून मोठे स्वप्न साकार करा हे करत असताना बॅक क्षेत्रातील अद्यावत माहिती आपल्या जवळ असणे गरजेचे आहे , तुमच्याकडे बाजार उपलब्ध नसेल तर तो आम्ही आमच्या फौडेशंन च्या माध्यमातून उपलब्ध करून देवू मात्र महिलांनी उद्योजक होण्याचे स्वप्न पहावे.यावेळी हातकणंगलचे नायब तहसिलदार संदीप चव्हान यांनी ही आपल्या मनोगता मध्ये महिलांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी व्यवसायाकडे वळावे असे आवाहान केले.या कार्यक्रमास नायब तहसिलदार रुपाली सुर्यवंशी , माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी श्री ठोंबरे यांनी आपले मनोगते व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदशन अलका रविंद्र कांबळे यांनी केले.या कार्यक्रमास उद्योग भवनचे निरिक्षक प्रज्वल कणसे उपस्थित होते.या मेळाव्यास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!