मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हातकणंगले येथे महारक्तदान संकल्प!

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी 

 

भारतीय जनता पार्टी हातकणगले मंडळाच्यावतीने माजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त “महारक्तदान संकल्प” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम दिनांक २२ जुलै २०२५ रोजी, मंगळवार, सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री विठ्ठल मंदिर, हातकणगले येथे पार पडणार आहे.

 

“रक्तात आहे… राष्ट्रभक्ती!” या घोषवाक्याखाली घेण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमातून राष्ट्रसेवेचा संदेश देण्याचा आणि रक्तदानाच्या माध्यमातून जीवन वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. आमदार अशोकराव माने श्री. अरुणरावजी इंगवले(अण्णा), जेष्ठ जि.प. सदस्य ),, प्रभारी मेथे शहराध्यक्ष अमर इंगवले नगरसेवक राजू इंगवले मंडळ अध्यक्ष शीतल हावळे, मंडळ अध्यक्ष , दीनानाथ मोरे, मयूर कोळी, विजय निंबाळकर, अण्णासाहेब चौगले, राजू वाडकर, प्रकाश मोरे, विश्वविजय मोरे, पंकज चौगले, मधुकर परीट, मिथुन जाधव, अभिजीत लुगडे, सौ. नंदा चौगले, रेखा घाटगे, आणि मानसी पाटील आदी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

 

या सामाजिक उपक्रमाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला, रक्तदानासारख्या पुण्यकार्यात सहभागी होऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या

error: Content is protected !!