पुलाची शिरोली ग्रामपंचायतीची धडक कारवाई थकबाकीदार व्यावसायिकांच्या दुकान, मंगल कार्यालयाचा रस्त्यात चर मारूनच पाणी कनेक्शन कट

Spread the love

पुलाची शिरोली ग्रामपंचायतीची धडक कारवाई थकबाकीदार व्यावसायिकांच्या दुकान, मंगल कार्यालयाचा रस्त्यात ( खोदून) चर मारूनच पाणी कनेक्शन कट केले

 पुलाची शिरोली / प्रतिनिध कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील ग्रामपंचायतीने थकबाकी वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ग्रामपंचायतीचा कर (फाळा) न भरणाऱ्या व्यावसायिक मिळकती, कमर्शियल गोडाऊन आणि मंगल कार्यालयांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली असून जेसीबीच्या साहाय्याने या व्यवसायिकांच्या दारातील रस्ता खोदून आडवी चाच मारून नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. या मिळकत धारकांकडे जवळपास ५० लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे . यामध्ये चौहान स्टील , आर आर बाॅडी , रुक्मिणी मंगल कार्यालय यांच्यावर कारवाईचा बडगा ग्रामपंचायतीने उचलला तर या कारवाईमुळे अन्य संबंधित थकबाकीदारांनी ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेवून फाळा भरायला समिती दर्शविली .

शिरोली ग्रामपंचायतीने अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीचा कर न भरणाऱ्या थकबाकीदारांना यापूर्वीच लोक अदालत कडून कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिसा देऊनही संबंधित मिळकत धारकांनी कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायतीने अखेर कठोर पावले उचलली.

या कारवाई मोहिमेअंतर्गत, या व्यावसायिक मिळकतीच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदून येणारी जाणारी वाहतूक रोखण्यात आली, तसेच त्यांचे पाणी कनेक्शनही तोडण्यात आले. ग्रामपंचायतीने विशेष ठराव करून ही कारवाई पूर्ण केली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ग्रामविकास अधिकारी सौ. गीता कोळी म्हणाल्या की वारंवार सूचना देऊनही ज्या मिळकत धारकांनी कर भरला नाही, त्यांच्यावर ही कारवाई केली जात आहे. जर या संबंधित व्यावसायिकांनी त्वरित थकबाकी भरली नाही, तर ग्रामपंचायत अधिनियमानुसार मालमत्ता जप्तीची प्रक्रिया राबवून त्याचा लिलाव केला जाईल व या लिलावातून ग्रामपंचायत कर वसुल करण्यात येईल व भविष्यातही ज्या थकबाकीदारांनी नोटिशीनंतर प्रतिसाद दिला नाही तर त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल असे त्या म्हणाल्या . या धडक कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, काहींनी तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेऊन थकबाकी भरण्याची तयारी दर्शवली आहे.

या कारवाईवेळी ग्रामविकास अधिकारी सौ. गीता कोळी, माजी उपसरपंच कृष्णात करपे, ग्रामपंचायत सदस्य महमद महात, आरिफ सर्जेखान, दीपक यादव , महादेव सुतार यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!