पुलाची शिरोली येथील राष्ट्रसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,राष्ट्रसेवा या प्रशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक ३ जानेवारी रोजी पटेल मल्टीपर्पज हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडले.वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत दिनांक २ जानेवारी रोजी प्रशालेत विज्ञान प्रदर्शन,रांगोळी प्रदर्शन,चित्रकला व कार्यानुभव प्रदर्शन, स्नेहभोजन यांचेही आयोजन करण्यात आले होते. शिरोली येथील राष्ट्र सेवा प्रशाला गेली ३३ वर्षे ज्ञानदानाचे कार्य करत असून या प्रशालेत अनेक विद्यार्थी उच्च पदावरती कार्यरत आहेत.त्यामुळे प्रशालेचे व शिरोली गावाचे नाव लौकिक वाढला आहे.या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन राष्ट्रसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाजीराव सातपुते व उपाध्यक्ष राजीव चौगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन संस्थेचे अध्यक्ष बाजीराव सातपुते,उपाध्यक्ष राजू चौगुले संस्थेचे सचिव मुख्याधापक सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे सचिव सुभाष पाटील सर होते.तर संस्था अध्यक्ष बाजीराव सातपुते,उपाध्यक्ष राजू चौगले,पी.डी चौगले,शांतीनथ कुन्नूरे,शशिकांत चव्हाण, मनीष दटमजगे,एस.बी.चौगले तसेच एलिट हॉस्पिटलचे डॉ.विजयकुमार बर्गे,डॉ.विक्रमसिंह नांगरे,दीपक माने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी विज्ञान, रांगोळी,चित्रकला व कार्यानुभव प्रदर्शनामध्ये सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.या स्नेहसंमेलनाची सुरुवात गणेश वंदना या गीताने झाली तदनंतर वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये नृत्य,एकांकिका,ऐतिहासिक गीते असे विविध गुणदर्शन सादर केले व उपस्थिततांची मने जिंकली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.पी.चौगुले सर,सौ. एस.एस.कुंभार मॅडम,शाहरुख मनेर सर यांनी केले.या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले.वंदे मातरम या देशभक्तीपर
गीताने वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.