कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
यांची शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बाहुबली येथे बुधवार दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी विद्यार्थी गुणगौरव, सत्कार समारंभ व स्नेहभोजन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील ,कोषाध्यक्ष बाहुबली विद्यापीठ बाहुबली हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हसमुखलाल प्रेमचंद गाला, कोल्हापूर शिवगोंडा दादा सदलगे,कोल्हापूर, बाबासाहेब चौगुले, सदस्य शालेय समिती,बाहुबली हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे महामंत्री डी. सी. पाटील हे उपस्थित होते.तसेच प्रमुख उपस्थिती रवींद्र खोत, सदस्य,बाहुबली विद्यापीठ बाहुबली,अशोक पाटील, सदस्य बाहुबली ब्रह्मचर्याश्रम बाहुबली, एस.बी. चौगुले, सहसचिव, समन्वय समिती, बाहुबली, एडवोकेट सुधीर पाटील, सदस्य शालेय समिती,बाहुबली आप्पासाहेब चौगुले उपाध्यक्ष दिगंबर जैन एन्डोमेंट ट्रस्ट, कुंभोज हे होते.सुरुवातीला प्रशालेच्या विद्यार्थिनींनी मंगलाचरण व स्वागतगीत गायन केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन संपन्न झाले. स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सन्मान प्रशालेच्या वतीने करण्यात आला. सन्मती मासिक याला ७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने भद्र मंजुषा ड्रॉ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आले.तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हसमुखलाल प्रेमचंद गाला यांनी प्रशालेला डिजिटल स्मार्ट बोर्ड साठी १ लाख ५० हजार रुपयाची दानराशी विद्यालयाला सुपूर्द केली.मुख्याध्यापक मनोगतामध्ये गोमटेश बेडगे यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यकाळात किती खडतर परिश्रम करणे आवश्यक आहे तसेच एमपीएससी, यूपीएससीची तयारी आतापासूनच जर आपण केलात तरच पुढचे भवितव्य अतिशय योग्यपणाने होणार आहे, असे आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केले. संस्था प्रतिनिधी मनोगत मधून बाहुबली विद्यापीठ बाहुबली चे महामंत्री डी.सी. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना या वयामध्येच वाव देणे योग्य पणाने ठरणार आहे व आपल्या गुरुजनांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे असे सांगितले.त्यानंतर विद्यार्थी सन्मान यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता आठवी एन. एम. एम. एस. परीक्षा, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, तसेच इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये धवल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांसमवेत संपन्न झाला.शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये झालेल्या विविध स्पर्धेचे निकाल व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शेवटी आभार अरुण चौगुले, व्यवसाय विभाग प्रमुख यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई,अध्यापक- अध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक तसेच पत्रकार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अध्यापकांच्याकडून स्नेहभोजन संपन्न झाले. सूत्रसंचालन स्मिता निटवे व प्रदीप धोत्रे यांनी केले.