मी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडलो नाही सोडणारही नाही आणि कोणीही मला स्वाभिमानीचा बिल्ला काढ म्हणू शकणार असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल उर्फ सावकर मादनाईक यांनी कोल्हापूर येथे बोलताना दिली.यावेळी मादनाईक पुढे म्हणाले माजी खासदार राजू शेट्टी यांनी माझ्या हकालपट्टी
बाबत सोशल मीडियातून प्रतिक्रिया व्यक्त केली असून मात्र मी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन झाल्यापासून सदस्य म्हणून आहे आणि कार्यकारणी मध्ये सुद्धा असून या संघटनेतून मला कोणी बाहेर काढू शकणार नाही, विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय भूमिकेबद्दल जनतेची नाराजी असताना उमेदवारी दिल्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे,त्यामुळे आता राजू शेट्टी यांनी आत्मचिंतन करावं असा सल्लाही मादनाईक यांनी शेट्टींना दिला आहे.