शिरोळ / प्रतिनिधी
येथील जुन्या काळातील शिक्षक शामराव शंकरराव माने (रहिमतपूरकर) यांचे वयाच्या ९४ व्यावर्षी बुधवार दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.शामराव माने यांनी जुन्या काळात १९५३ साली आपल्या शिक्षेकी पेशाला शाहूवाडी व तेथील दुर्गम भागातून सुरुवात केली होती.त्यावेळी वाहतुकीची सुविधा नसल्याने शिरोळ ते शाहूवाडी या ठिकाणी आठवड्यातून सायकलवरून प्रवास करीत होते. त्यांनी पन्हाळा, शाहूवाडी, तालुक्यात पंधरा वर्षे तर उर्वरित सेवा शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती,आगार,शिरटी, कनवाड या ठिकाणी बजावली आहे.बुधवारी ११ वाजण्याच्या दरम्यान त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.कुरुंदवाड येथील एस.पी.हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक सतीश माने व शिरोळचे माजी तंटामुक्त अध्यक्ष अविनाश उर्फ पांडुरंग माने यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, दोन मुली,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक ५ डिसेंबर२०२४ रोजी सकाळी ९ वाजता पंचगंगा नदीतीरी जगदाळे वैकुंठ धाम येथे होणार आहे.