जयसिंगपूर / प्रतिनिधी
राज्यभरात मराठा आरक्षणाच्या संदर्भात साखळी उपोषण सुरु आहे.जयसिंगपूर येथेही उपोषण सुरू आहे.शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिलाध्यक्षा स्नेहा वसंतराव देसाई यांनी भेट देवून पाठींबा जाहीर केला.आरक्षणाचा प्रश्न लवकर मिटला नाही तर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने ही उग्र आंदोलन केले जाईल.असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी जयसिंगपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा -मेघा गायकवाड,महिला तालुका उपाध्यक्षा बेगम इकबाल सुदरणे,विद्या सावंत,तबस्सुम शेख,महादेवी यदग्यार,नूरजहाँ खतीब,शमा मुलाबी,वसंतराव देसाई,मराठा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव घुणकीकर,जालिंदर बसुगडे,संभाजी मोरे,बजरंग खामकर,दिपक धनवडे,बबलू माने,अशोक पाटील,सुधीर खाडे,विश्वास देवाळे,प्रकाश पवार,जीवन पाटील,इकबाल सुदरणे यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते,मराठा बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.