नंदीवाले समाजाच्या प्रगतीसाठी गणपतरावदादांना विजयी करा – सौ अस्मिता पाटील

शिरोळ येथे नंदीवाले समाजातील महिलांचा जनसंवाद मेळावा

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ तालुक्याचे माजी आमदार स्व. डॉ अप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांचे आणि नंदीवाले समाजाचे जिव्हाळ्याचे संबंध होते.या समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते सा.रे.पाटील साहेबांच्या कार्याचा वारसा उद्यान पंडित गणपतरावदादा पाटील हे समर्थपणे पुढे नेत आहेत नंदीवाले समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवून समाजाच्या प्रगतीसाठी ते प्रयत्न करतील यामुळे शिरोळ विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना प्रचंड मताधिक्यानी विजयी करावे.असे आवाहन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ.अस्मिता पाटील यांनी केले.शिरोळ येथील नंदीवाले वसाहत येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतरावदादा पाटील यांच्या प्रचारार्थ महिला जनसंवाद मेळावा आयोजीत करण्यात आला होता‌.यावेळी सौ अस्मिता पाटील या बोलत होत्या.बोलताना त्या पुढे म्हणाल्या की माझे आजोबा डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील आणि वडील सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांनी जे काम केले आहे ते सर्वसमावेशक आहे.नंदीवाले समाज आणि आमच्या पाटील परिवाराचा पिढानपिढ्या घरोबा आहे. याचा आम्हा परिवाराला अभिमान आहे.उद्याच्या निवडणुकीत हाच जिव्हाळा सोबत घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवावे.आपल्या समाजाच्या अपूर्ण योजना निश्चितपणे नजीकच्या काळात पूर्ण केल्या जातील. यापुढे समाजाच्या प्रगतीसाठी मी स्वतः तुमच्या सोबतच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते एम एस माने हे स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाले की नंदीवाले या भटक्या समाजाला भूमीची आणि छपराची सावली माजी आमदार स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांनी देऊन त्यांना भूमिपुत्र बनवले. या समाजाची वणवण आणि भटकंती संपवली. याची जाणीव समाजाने अंतकरणात साठवून ठेवलेली आठवण उद्याच्या शिरोळ विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड मताच्या रूपाने उभे राहणार असल्याचे ह्या महिला जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने दिसून येत असल्याने गणपतराव दादांचा विजय हा काळा दगडावरील पांढरी रेघ आहे. स्व. डॉ अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्व. युसुफसाहेब मेस्त्री यांच्या कार्याची पोचपावती हा नंदीवाले समाज देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी माजी नगरसेविका सौ विदुला यादव,श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ संगिता पाटील-कोथळीकर,संचालक मंजूर मेस्त्री, सौ सानिया मेस्त्री, कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ योगिता घुले यांच्यासह नंदीवाले समाजातील सर्व महिला उपस्थित होत्या.आभार रामा नंदीवाले यांनी मानले.

Spread the love
error: Content is protected !!