“बदल हवा” जयसिंगपूरकरांची भावना,गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला उस्फुर्त प्रतिसाद

जयसिंगपूर / प्रतिनिधी
शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर शहराच्या उपनगरात मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा काढण्यात आली.या प्रचार दौऱ्यात महिलांनी औक्षण करून उमेदवार गणपतराव पाटील यांचे स्वागत केले.ठिकठिकाणी फाटक्याची आतिषबाजी व पुष्पवृष्टी करण्यात आली.पदयात्रेला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.वाद्यवृंदासह निघालेल्या प्रचार दौऱ्यात आबालवृद्धासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.मतदारांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता गणपतराव पाटील हे आमदार होणार अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या.सकाळी दहा वाजता जयसिंगपूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला.राजीव गांधी नगर येथील सुरू झालेली पदयात्रा दुर्गा मंदिर,बाळूमामा मंदिर,रेणुका मंदिर, हनुमान चौक,श्याम नगर,शिंदे खामकर मळा,जय विजय चौक आदी परिसरात काढण्यात आली.महिला व तरुण मतदारांचा मोठा सहभाग यावेळी होता.गणपतराव पाटील दादांचा विजय असो,येणार येणार हात येणार, महाविकास आघाडीचा विजय असो,अशा घोषणांनी पदयात्रा लक्षवेधी ठरली.उमेदवार गणपतराव पाटील यांनी मतदारांशी थेट गाठीभेटी घेत सेवा करण्याची संधी द्यावी, आशीर्वाद राहू द्या,मी तुमचा आमदार म्हणून पाच वर्षे जनसेवक म्हणून कार्यरत राहीन असा विश्वास मतदारांना दिला.काही ज्येष्ठ वयोवृद्ध मतदारांनी पाटील यांच्याशी भेट घेऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देत त्यांनीही प्रचारात सहभाग नोंदविला.यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे, अशोकराव कोळेकर, सर्जेराव पवार, हसन देसाई, चंद्रकांत जाधव घुणकीकर, संजय पाटील कोथळीकर, मुसा डांगे, युनूस डांगे, दिलीप पाटील कोथळीकर, माजी नगराध्यक्षा अनिता कोळेकर, दत्तच्या संचालिका अस्मिताताई पाटील, अर्चना संकपाळ, रघुनाथ देशिंगे, वरूण पाटील, संतोष जाधव, गुंडाप्पा पवार, राजू पवार, सुनील घोलप, रोहित बागडी, हिना शेख, जुबेदा शेख, उज्वला वाघमोडे, उषाताई खरात, सुजाता कोळी, सरिता कोकरे, कल्पना सातपुते, सुवर्णा वैदू, अंजू वैदू, सोनू वैदू, शिवानी वैदू, मुत्तव्वा वैदू, मोना रॅगडे, अक्काताई रॅगडे, सोनू वरगंटे, वंदना आंबी, गुंडाप्पा पवार, दुर्गाप्पा वैदू, अजित चव्हाण, अशोक बेलदार, दीपक भोसले, पिंटू वगरे, अंकुश खरात,  रोहित पाटील, सौरभ पाटील, अभिषेक भंडारे, भूषण मोगलाडे महादेव पाटील, सोनू बागडी, राहुल कोळी, बंडू पवार, दिलीप पवार, स्वप्निल कांबळे, नंदू कदम, सलीम नदाफ, रवी वैदू, राज वैदू, रमेश जाधव, अनिल पाटील, अमोल पाटील, संदेश तिवडे, आकाश मंटाळे, करण वैदू, आकाश वरगंटे, रोजन वरगंटे, ओम वैदू, शिवा वैदू, मनीष शिर्के, परशुराम वरगंटे, राहुल वैदू, सुजल वैदू, रोहित वैदू, राम शिर्के, विकी वरगंटे, मारुती रागटे, उपनगरातील ग्रामस्थ, मतदार उपस्थित होते. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही मोठा सहभाग दर्शविला.
Spread the love
error: Content is protected !!