वारसदार म्हणता मग २०१४ साली वडिलधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक का लढवली – वैभव उगळे

शिरोळ / प्रतिनिधी

जे आज स्वतःला सा.रे.पाटील यांचे वारसदार समजतात तेच 2014 साली वडिलधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढवले होते.मग यांना वारसदार कसे म्हणायचे असा उपासात्मक टोला शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी लगावला.दानोळी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित विजय निश्चय मेळाव्यात ते बोलत होते.उगळे पुढे म्हणाले खरा वारसदार गणपतराव पाटील तर आपल्यासमोर आहेत आणि हा वारसदार खंबीर आहे.स्व. सा. रे.पाटील यांनी राजकारणाबरोबरच कारखाना, विविध संस्थांच्या माध्यमातून प्रचंड मोठे काम केले.पुरोगामी चळवळीला साथ देण्याचेही त्यांनी काम केले.कर्तृत्ववान माणसाचा वारसदार होणे हे अतिशय अवघड असते,पण गणपतराव पाटील यांनी सा.रे.पाटील यांच्या विचारांचा वारसा सुरूच ठेवला आहे.गणपतराव पाटील यांना सा.रे.पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून बघायचे असेल तर सर्व मतदारांनी त्यांना एक संधी देणे गरजेचे आहे.माजी आमदार राजीव आवळे म्हणाले,मतदारांनी मान शरमेने खाली घालावे आणि मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे. त्यांना जर संधी दिली तर ते पुन्हा एकदा जातीयवादी पक्षाला बळकटी देण्यासाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील. जो आपल्या मतांचा बाजार मांडतो त्याला थांबवणे गरजेचेच बनले आहे. शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या गणपतराव पाटील यांना निवडून देण्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि त्यांना सेवा करण्याची संधी द्या.महादेवराव धनवडे, रावसाहेब भिलवडे, स्नेहा देसाई, सतिश भंडारे, दिगंबर सकट, कु. बुशेरा खोंदू, श्रावण कांबळे, रफिक पटेल आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी चंगेजखान पठाण, मधुकर पाटील, बाजीराव मालुसरे, माणिक जगदाळे, श्रावण गावडे, सुरेश माणगांवे, सतिश देसाई, संदीप पोवार, सुनिल होगले, राजदीप थोरात, जोतीराव कणसे, विलास भोसले, अल्ताफ इनामदार, सुभाष सकाप्पा, नागेश खिलारे, गोपाळ माने, रोहित धनवडे, महेश दळवी, वसंतराव देसाई, स्वाती सासणे, रमेश शिंदे, जीवन बरगे, दिनेश कांबळे, किरण भोसले, देवेंद्र कांबळे, हसन देसाई, संदीप बिरणगे, राजेंद्र प्रधान, अनिरुद्ध कांबळे, बनाबाई कांबळे, राजू आवळे, योगेश पुजारी यांच्यासह ग्रामस्थांची प्रचंड गर्दी होती.

Spread the love
error: Content is protected !!