लायन्स क्लबच्यावतीने लायन क्वेस्ट शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
मुलांच्या मध्ये चिंतन,मनन, वाचन,नवविष्कार,सामाजिक बांधिलकी, नागरिकत्व इत्यादी गुणांचा विकास करण्यासाठी लायन्स क्वेस्ट हा उत्कृष्ट कार्यक्रम लायन्स इंटरनॅशनल संघटनेने निर्माण केला आहे.या अभ्यासक्रमातून मूल्य शिक्षणाचे मोठे काम होत आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबंध असणाऱ्या शिक्षकांना ही मूल्ये मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, गोष्ट रूपाने कशी शिकवावी याची प्रात्यक्षिके या कार्यशाळेत दिली गेली.या कार्यशाळेमुळे शिक्षकांच्या मनातील मरगळ दूर झाली व त्यांनी नवीन शैक्षणिक कौशल्ये आत्मसात केली.या कार्यशाळेमुळे शिक्षकांच्या वैचारिक व शिकवण्याच्या पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल झाल्याचे सर्व शिक्षकांनी मान्य केले.ही कार्यशाळा शिरोली एमआयडीसी मधील ‘स्मॅक भवन’ मध्ये संपन्न झाली. लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर, व लायन्स क्लब कोडोली यांनी संयुक्तपणे ही कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेसाठी लायन बी एल जोशी यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षक म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केले. लायन्स संघटनेच्या वतीने लायन सुहास निकम डिस्ट्रिक्ट चेअरमन, लायन्स क्वेस्ट हे उपस्थित होते.या कार्यशाळेचे उद्घाटना ऍड.एम के पाटील डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, इस्रो चे ज्येष्ठ वैज्ञानिक माननीय बाळासाहेब पाटील, चेअरमन, संस्कार भारती शिक्षण संस्था शिरोली व माननीय राजू पाटील सदस्य, स्मॅक शिरोली यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लाय न डॉक्टर सर्जेराव पाटील, अध्यक्ष, लायन्स कोल्हापूर ट्रस्ट,कोल्हापूर यांनी केले. यावेळी एडवोकेट एम के पाटील,बाळासाहेब पाटील,राजू पाटील,लायन सुहास निकम,लायन बी एल जोशी,लायन सर्जेराव पाटील,लायन श्रद्धानंद रणदिवे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन सदानंद रणदिवे होते तर ध्वजवंदन नागेश वाले यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लायन अरविंद पवार यांनी मानले.
यावेळी लायन अमोल पाटील, लायन गंगाप्रसाद बंडेवार, डॉ.बाजीराव पाटील,एक्झिक्युटिव्ह चेअरमन, माननीय विश्वास पवार संस्थापक संचालक, डॉक्टर वसंत शिंदे सेक्रेटरी, संस्कार भारती एज्युकेशन फाउंडेशन, स्मॅकचे संचालक सुमंत पाटील मुख्याध्यापिका योगिता लंबे, मुख्याध्यापिका रेखा सुतार, व कौतुक विद्यालय,शिरोली व कौतुक विद्यालय, हेर्ले या दोन शाळेमधील 35 शिक्षक उपस्थित होते.