शिरोळ / प्रतिनिधी
अकिवाट येथील गायरान जमिनीवर इंडस्ट्रियल इस्टेट झाल्यास येथील ग्रामस्थांना आणि परिसरातील नागरिकांना प्रचंड मोठा त्रास आणि अडचण होणार आहे. त्यामुळे तेथे इंडस्ट्रियल इस्टेट न करता गायरानची ही जागा कायमस्वरूपी गायरानच म्हणूनच राहील यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.गावकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीर राहीन,असे आश्वासन शिरोळ विधानसभेचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी दिले.तसेच अकिवाट येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामात खंड पडला असून हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
अकिवाट येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित पदयात्रा,रॅली काढल्यानंतर झालेल्या विजय निश्चय सभेत ते बोलत होते.माजी जि.प.समाज कल्याण सभापती स्वाती सासणे म्हणाल्या,महागाईची झळ सर्वच माता बहिणींना पोहोचत आहे.पंधराशे रुपये देऊन या माता-भगिनींची व्यवस्था करू म्हणत धमकी देण्याचे काम महायुतीचे खासदार करीत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रकरणात महिलांना तुरुंगात घालण्याचे काम झाले आहे.अशा लोकांच्या आपण पाठीशी राहणार आहोत की शांत,संयमी नेतृत्वाच्या मागे राहणार आहोत याचा विचार लोकांनी करावा.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिरोळ तालुका महिला आघाडी अध्यक्षा स्नेहलता देसाई म्हणाल्या,लाडकी बहीण योजनेतून दिले जाणारे पैसे म्हणजे दाजीच्या खिशातून पैसे काढून लाडक्या बहिणीला देऊन भावाचे नाव करण्याचा प्रकार आहे. फसवाफसवी,फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याची परिस्थिती दयनीय झाली असून शेतकरी हित जोपासणाऱ्या मविआच्या गणपतराव पाटील यांना निवडून देणे गरजेचे आहे.डॉ.दगडू माने म्हणाले, शेतकऱ्याचा मुलगा सामाजिक,सहकार याच्याशी नाळ जोडून घेऊन सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो आहे. गणपतराव पाटील यांच्या कामाला बळ देण्यासाठी मी प्रहार पक्षाचा राजीनामा देऊन त्यांच्या विजयासाठी काम करीत आहे. 100 टक्के कामाचे कौतुक केले पाहिजे, पण विरोध म्हणून कौतुक नको.तालुक्यात परिवर्तन होणार असून गणपतराव पाटील यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसू नका.बाळसिंग रजपूत,ऍड. नेमिनाथ कांबळे,कु.बुशेरा खोंदू यांनी मनोगत व्यक्त केले. निलेश तवंदकर यांनी आभार मानले.टाकळीवाडीच्या तरुणांनी गणपतराव पाटील यांना पाठिंबा दिला.
श्री दत्त कारखाना संचालक अरुणकुमार देसाई,संजय पाटील,आप्पासाहेब नाईक हलसवडे,माजी संचालक डी. आर. पाटील, रमेश पाटील, उपसरपंच आप्पासाहेब म्हैशाळे, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख बाजीराव मालुसरे, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, मधुकर पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगलाताई चव्हाण, प्राचार्य टी.एस.पाटील,पृथ्वीराजसिंह यादव, संजय अणुसे, हेमंत पाटील, दीपक कांबळे, आकाश कुरणे, अमोल तगारे, रावसाहेब नाईक, राजू फराळे, बापूसो कोळी, कुमार मिठारे, अण्णासो वळवाडे, इरगोंडा देसाई, कासिम मुल्ला, दत्तात्रय कदम, राजू पाटील, अनुराधा कांबळे, रमेश कांबळे, बाबासाहेब रायनाडे, सागर गावडे, शानाबाई कांबळे, शरावती माने, सुदर्शन माने, रावसाहेब आवटी, राजेंद्र पिंपळे, संजय पल्लखे, काशिनाथ पाणदारे, नागू हेरवाडे, अंजना कांबळे, संतोष नरके, उदय रजपूत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.