शिरोळ / प्रतिनिधी
महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राचे सृजनशील राजकारण बिघडवून टाकले आहे.विविध योजना जाहीर करायच्या आणि त्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार करायचा हेच सुरू आहे.विकासाच्या गप्पा मारणे वेगळे आणि प्रत्यक्षात काम करणे वेगळे असते.विरोधकांच्याकडे फक्त प्रश्ने असून महाविकास आघाडीकडे राज्याच्या प्रगतीची उत्तरे आहेत.शिरोळ तालुक्याचा विकास करण्यासाठीच 78 वर्षाचा नवयुवक या विधानसभेच्या महासंग्रामात उतरला आहे.गणपतराव पाटील यांच्यासारखा प्रश्नांची सोडवणूक करणारा,चांगला,आपला आणि हक्काचा माणूस विधानसभेत पाठवा असे आवाहन शिवसेना तालुका संपर्कप्रमुख बाजीराव मालुसरे यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित पदयात्रा,रॅली काढल्यानंतर झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते.
बस्तवाडचे दिलावर पटेल म्हणाले,आदरणीय स्व. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार आणि स्व.सा.रे.पाटील साहेबांनी शिरोळ तालुक्याच्या विकासाचा पाया अतिशय घट्ट आणि मजबूत केला आहे.हा पाया भक्कम असल्यामुळेच विकासकामांची वरची इमारत दिसत आहे. बस्तवाड आणि सा.रे.पाटील यांचे नाते वेगळे असून गणपतराव पाटील यांना आम्ही प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करण्यासाठी कटिबद्ध आहोत.बस्तवाड गावचे आणि सा. रे. पाटील तसेच माझे नाते मजबूत आणि खंबीर असून तालुक्याचा विकास साधण्यासाठी मला विजयी करा असे आवाहन गणपतराव पाटील यांनी केले.
शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंगलाताई चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरोळ तालुका महिला आघाडी अध्यक्ष स्नेहलता देसाई, सुरेंद्र उमराणी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक अनिल उमराणी यांनी केले. आभार दिलावर पटेल यांनी मानले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, मधुकर पाटील, प्राचार्य टी. एस. पाटील, पृथ्वीराजसिंह यादव, राजेंद्र प्रधान, परवीन जमादार, स्नेहा जगताप, वसंतराव देसाई, रवी जाधव, हसन देसाई, मिनाज जमादार, चंद्रकला पाटील, स्वाती सासणे, रेखा पाटील, राजश्री मालवेकर, दिनेश कांबळे, राजू आवळे, अमन पटेल, बापूसो पटेल, सागर ऐनापुरे, प्यारेसाहेब पाटील, सरपंच अम्माजान पटेल, उपसरपंच किरण कांबळे, भरमू नाईक, चंद्रकांत जंगम, जाफर पटेल, शब्बीर नायकवडे, ईश्वरा ऐनापुरे, दशरथ कांबळे, गणेश पाखरे, निंगाप्पा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते