अभिजीत माने यांच्या गुरुदत्त इलेक्ट्रिकल्स फर्मला दिली सदिच्छा भेट
शिरोळ / प्रतिनिधी
ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय करण्यासाठी चालना आहे यामुळे युवकांनी पुढाकार घेऊन स्वावलंबी बनले पाहिजे विशेषता दूध उत्पादन व्यवसाया करून प्रगती साधता येते असे अनेकांनी सिद्ध केले आहे.यामुळे दूध उत्पादन व्यवसायाकडेही तरुणांनी वळले पाहिजे विशेषता म्हैस दूध उत्पादन करणाऱ्या दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघाचे नेहमीच सहकार्य राहील असे आश्वासन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणराव डोंगळे यांनी दिले.शिरोळमधील युवा उद्योजक अभिजीत माने यांच्या श्री गुरुदत्त इलेक्ट्रिकल्स या फर्मला अरुणराव डोंगळे यांनी सदिच्छा भेट दिली.शिरोळभूषण दिलीपराव माने यांनी गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणराव डोंगळे व कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांचा सत्कार केला.यावेळी डोंगळे यांनी एकत्रित कुटुंब पद्धतीतून माने परिवाराने प्रगती साधून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.यामुळे तरुणांनी विशेषतः उद्योग व्यवसाय केलेच पाहिजेत ग्रामीण भागात पशुपालन करून दूध उत्पादन करण्याचा व्यवसाय फायदेशीर ठरत आहे. बाजारात म्हैस दुधाला मागणी जास्त आहे.यामुळे मुक्त गोठा पद्धत अवलंबून म्हैस दूध उत्पादनाचा व्यवसाय सुरू करावा याकरिता गोकुळ दूध संघाचे सहकार्य राहील असे आश्वासन दिले.यावेळी युवा उद्योजक अभिजीत दिलीपराव माने,लालासो दिलीपराव माने,बाळासो माने, भाऊसो माने,अनिकेत जोशी,रमेश पाटील,अभिजीत कुंटे, ओम टीव्हीएसचे सचिन माने-गावडे,सुरज मोरे,दीपक बिसूरे,पिंटू माळी,प्रशांत सूर्यवंशी,अतुल जणवाडे यांच्यासह गोकुळ दूध संघाचे संकलन अधिकारी अशोक पाटील,वरिष्ठ पर्यवेक्षक सुहास डोंगरे,सतीश मदने,राहुल राजमाने,अनिल पाटील आणि कर्मचारी अधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.