१६ हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार लाचलूचपत पथकाच्या जाळ्यात

हातकणंगले / प्रतिनिधी सुकुमार अब्दागिरे

 

हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रविकांत विक्रांत भैरू शिंदे, वय 50 वर्षे, सध्या, रा. मोरे यांचे घरी भाड्याने पाच तिकटी, हातकणंगले,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर, मूळ रा.फणसवाडी, ता.भुदरगड यांना १६ हजाराची लाच घेताना लाचलूचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई आज शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता करण्यात आली.याबाबत मिळालेली माहीती अशी की तक्रारदार यांचे कुंभोज, ता.हातकणंगले येथे किराणा मालाचे दुकान आहे. तक्रारदार हे किराणा मालाचे दुकानात गुटखा विक्री करतात.दरम्यान हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांना साधारण एक महिन्यापूर्वी पोलीस ठाण्यात भेटण्यास बोलावून तुम्ही गुटखा विक्री करतात तुमच्यावर कायदेशीर कारवाई न करता गुटखा विक्री करायचे असेल तर मला प्रति महिना १० हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करतो अशी भीती घातली.त्यानंतर दिनांक १६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पावणे पाच वाजता तक्रारदार यांचे फोनवर फोन करून तक्रारदार यांना पोलीस ठाणे भेटण्यास बोलावले. तक्रारदार भेटण्यास गेले असता पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे गुटखा विक्री करायचे असल्यास प्रति महिना १० हजार रुपयाची मागणी करून तडजोडीअंती ४ हजार रुपये प्रति महिना प्रमाणे मागील चार महिन्याचे मिळून 16 हजार रुपयाची तक्रारदार यांच्याकडे मागणी केली,याबाबाबतची तक्रारदार यांनी लाच लुचपत विभाग कार्यालयाकडे तक्रार दिली होती.सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस हवालदार रविकांत शिंदे यांचे लाच मागणीची पडताळणी केली असता पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे १६ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण झाले.तक्रारदार यांच्याकडे १६ हजारची मागणी केली मागणी केलेप्रमाणे पोलीस हवालदार रविकांत शिंदे यांनी तक्रारदार यांचेकडून १६ हजार रुपये स्वीकारताना त्यांना आज शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.ही कारवाई लाच प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी व पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत शाखेचे पोलीस निरीक्षक बापु साळुंके,सापळा पथक पो.ह.सुनील घोसाळकर, संदीप काशीद, पो.ना.सचिन पाटील,संदीप पवार,चा कुराडे यांनी सहभाग घेतला.

 

श्रीमती वैष्णवी पाटील, 
 पोलीस उप अधीक्षक,
लाचलूचपत प्रतिबंधक विभाग,कोल्हापूर.)
मो.नं. 9764140777
(कार्यालयीन क्रमांक/0231- 2540989)
कोल्हापूर. कार्यालय मेल आयडी(dyspacbkolapur@gmail.com) यावर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता.
@ टोल फ्रि क्रं. 1064
(आपण दिलेल्या तक्रारीबाबत आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल.)
Spread the love
error: Content is protected !!