आकाश शिंदे / कुंभोज
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 ऑक्टोंबर रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये २२ ते २९ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत उमेदवारांच्या वतीने अर्ज दाखल करण्यात येतील.४ नोव्हेंबर २०२४ रोजी माघार होईल.२० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया संपन्न होईल. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी कार्यक्रम होईल.अशी माहिती सदर परिपत्रकामध्ये देण्यात आली आहे.निवडणुकीचे बिगुल वाजले असून इच्छुक उमेदवारांसह आजी व माजी आमदार पायाला भिंगरी लावून मतदार संघाचे दौरे करत आहेत असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सध्याची होणारी विधानसभा निवडणूक 14 वी विधानसभा निवडणूक असून महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उपाध्यक्ष म्हणून सिताराम नरहरी झिरवळ आहेत. विधानसभा सभागृह नेते एकनाथ शिंदे ,विधानसभा सभागृह उपनेते देवेंद्र फडणवीस व अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार ,विधानसभा उपविरोधी पक्ष नेता बाळासाहेब थोरात आहेत.त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतांची संख्या ,महिला मतदार, पुरुष मतदार, तृतीयपंथीय मतदार, नवीन मतदार याची आकडेवारी पुढील प्रमाणे :
◼️चौकट :-
एकुण मतदार – ९ कोटी ५९ लाख
पुरुष मतदार – ४ कोटी ९५ लाख
महीला मतदार – ४ कोटी ६४ लाख
तृतीयपंथीय मतदार – ५९९७
नवीन मतदार – १९ लाख ४८ हजार
◼️मतदार संघांची रचना:-
सर्व साधारण मतदार संघ – २३४
SC मतदार संघ – २९
ST मतदार संघ – २५
मतदान केंद्र – १ लाख १८३
सदर माहिती सोशल मीडिया च्या माध्यमातून मिळवण्यात आली आहे.