कुरुंदवाडच्या आदित्यराज जोंग या विद्यार्थ्यांचा प्रामाणिक पणा

कुरुंदवाडच्या आदित्यराज जोंग या विद्यार्थ्यांचा प्रामाणिक पणा

कुरुंदवाड / प्रतिनिधी

कुरुंदवाड ता शिरोळ येथील अत्यंत अभिमानास्पद गोष्ट गुरुवारी दिनांक ३० नोव्हेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर
एस पी एम इंग्लीश मिडीयम स्कूल शाळेतील विद्यार्थी

आदित्यराज सचिन जोंग घरी जात असताना त्यांना एस.पी शाळेसमोर एक छोटी पर्स सापडली त्या पर्समध्ये सुमारे ५५००/-हजार रुपयाची रोख रक्कम तसेच दीड तोळ्याचे

गळ्यातले मंगळसूत्र तसेच एटीएम कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी मौल्यवान गोष्टी होत्या.एस.पी.एम.इंग्लीश मिडीयम स्कूल शाळेतील या विद्यार्थ्यांने प्रामाणिकपणे ती पर्स आणून

आपल्या शाळेमधील शिक्षकांकडे जमा केली नंतर ती सदर महिला पर्स शोधत असलेली दिसून आली असता आदित्यराज व त्याचे मित्र त्या महिलेस विचारपूस केली व आपल्या

शाळेमध्ये घेऊन आले सदरच्या सर्व वस्तू ओळख पटवून त्या महिलेला लगेच परत केल्या.या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्या महिलेने अत्यंत कौतुक उद्गार काढले

असून या इंग्लिश मीडियम स्कूल कुरुंदवाड ही शाळा संस्कारक्षम पिढी घडत असल्याचे समाधान व्यक्त केले.या मुलांच्या प्रामाणिकपणाबद्दलचे कौतुक करण्यासाठी आज त्यांना

आपल्या शाळेने देखणी ती पाऊले हे पुस्तक भेट म्हणून दिले. खरंच या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणाबद्दल कुरुंदवाड परिसरात कौतुक होत आहे.

Spread the love
error: Content is protected !!