कलाविश्‍व रंगभूमीतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर

सोमवारी सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रासह विविध मान्यवरांचा होणार गौरव

शिरोळ/प्रतिनिधी

येथील कलाविश्‍व रंगभूमी व सोशल फौंडेशन संस्थेच्या वतीने संस्थेचा वर्धापन दिन व मराठी रंगभूमी दिनानिमित्त शिरोळ तालुक्यातील कलाकार,पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

हा समारंभ सोमवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या जनरल ऑफीस सभागृहात होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान व उपाध्यक्ष रावसाहेब भोसले यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान यावेळी सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचालीबाबत‘आम्ही रंगकर्मी विशेषांकाचे’प्रकाशन होणार आहे.यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.तहसिलदार अनिलकुमार हेळकर व गटविकास अधिकारी शंकर कवितके हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत.

शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,युवा नेते पृथ्वीराज यादव,सामाजिक कार्यकर्त्या डॉ.आशाताई गाडीवडर-शिंदे, सिनेअभिनेत्री रेश्मा शेख,दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव,दरगू गावडे,शिरोळ पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर. पाटील,सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील-कणंगलेकर यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकार उपस्थितराहणार आहेत.

या वर्षीचे जाहीर झालेले पुरस्कार असे

दिव्या मगदूम (उदगांव)-संगीत प्रेरणा पुरस्कार
पियुष काकडे (शिरोळ)-नाट्यप्रेरणा पुरस्कार
अविनाश सुर्यवंशी(यड्राव)-आदर्श रंगकर्मी पुरस्कार
प्रज्ञा माळकर (शिरोळ)-वक्तृत्व प्रेरणा पुरस्कार
माजी सैनिक संजय माने(जयसिंगपूर)-सेवारत्न पुरस्कार
सुनिल संकपाळ (शेडशाळ)-आदर्श पत्रकार पुरस्कार
संतोष साने (यड्राव)-आदर्श पत्रकार पुरस्कार
बाळासाहेब माळी (शिरोळ)-आदर्श पत्रकार पुरस्कार
अनिल उर्फ राजू देशमुख (शिरोळ)-दिव्यांग सेवारत्न पुरस्कार

Spread the love
error: Content is protected !!