जयसिंगपूर / प्रतिनिधी
तमदलगे (ता.शिरोळ) येथील श्री गणेश देवालयाचा वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, आणि कळसारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे औचित्य साधून हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, आणि गणपती बाप्पा मोरया चा जयघोष केला.
तमदलगे येथील शिवाजीनगर परिसरात उभारलेल्या या मंदिरामुळे गावाचे रूपडच बदलून गेले आहे. 16 वर्षांनंतर लोकसहभागातून उभ्या केलेल्या या भव्य मंदिराचे बांधकाम अत्यंत आकर्षक बांधण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सकाळी 9 वाजता वास्तुशांती झाली. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, आणि नैवेद्य, आंबील, भिजाणे, व गारवा यासारख्या पारंपरिक विधींनी
सोहळ्यात रंग भरला. दुसर्या दिवशी जलधिवास सोहळा व नगरप्रदक्षिणा पार पडली, ज्यात संकष्टी चंद्रोदयाच्या वेळी रात्री 9 वाजून 2 मिनिटांनी श्री गणेशाची आरती करण्यात आली. तिसर्या दिवशी सकाळी 9 वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा पार
पडला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त समुहाचे अध्यक्ष गणपतदादा पाटील, प्रतीक पाटील, संभाजी भिडे गुरूजी यांनी भेट दिली.